यशवंत मनोहर

चरित्र

चरित्र

डॉ. यशवंत मनोहर (जन्म : २६ मार्च १९४३) हे मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत. त्यांचे बालपण नागपूर जिल्ह्यातील येरला या खेड्यात गरीब कुटुंबात गेले आणि अनेक हालअपेष्टा सोसत त्यांनी शिक्षण घेतले. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातून १९६५ मध्ये ते प्रथम श्रेणीत बी.ए. (ऑनर्स) झाले आणि १९८४ मध्ये नागपूर विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागातून ते २००३ मध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांत अनुवादित झाल्या आहेत.

समुदायाने जोडले
बंद