चरित्र
चरित्र
यशवंतराव बळवंतराव चव्हाण (१२ मार्च १९१३ – २५ नोव्हेंबर १९८४) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि 'महाराष्ट्राचे शिल्पकार' म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे झाला. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचेही ते पहिले मुख्यमंत्री होते. पुढील काळात ते भारताचे उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्री या पदांवर होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती. ते प्रागतिक विचारसरणीचे, रसिक आणि साहित्यिकही होते. 'युगांतर', 'सह्याद्रीचे वारे', 'कृष्णाकाठ' आणि 'ऋणानुबंध' ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
समुदायाने जोडले
बंद