मुखपृष्ठ

माझे शेल्फ

का कराचं शिकून ?

इंग्रजी शीर्षक
Ka Karacha Shikun ?
सारांश

समाजातील वाड्या-वस्त्यांतील, झोपडपट्ट्यांतील, भटक्या समाजातील हजारों मुले नापास होतात, यात त्यांचा दोष नाही; उलट ती नापास व्हावीत, ती शिकूच नयेत, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची रचना, शाळांची वेळापत्रके, शिक्षणखात्याची व मास्तरांची क्लिष्ट मानसिकता, यामुळे आपोआपच भटक्या-विमुक्त जमाती मागे पडल्या. अज्ञान, व्यावसायिक शिक्षणावर फारसा भर नाही. तसेच युती सरकार आल्यावर बहुजन समाजाच्या शिक्षणालाच ग्रहण लागलेलं. केवळ आम जनतेच्या कल्याणाचा घोष, वरवरच्या सर्व कल्याणकारी योजना, त्यामुळे भटक्या-विमुक्तांच्या सर्व पिढ्या शिक्षणाची हेळसांड करतच नरकात गेल्या; माध्यमिक शिक्षण मोफत झालं, तरी भटक्यांच्या शिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस कठीणच होत गेला. गरिबातल्या गरिबालाही शिक्षणाचं महत्त्व कळलं; पण आजही या व्यवस्थेबद्दल लोक अत्यंत असमाधानी आहेत. कारण शिक्षणासारख्या प्रभावी साधनाचाही शोषणाचे हत्यार म्हणून राजकीय लोक उपयोग करतात. शिकून व न शिकूनही आमच्या परिस्थितीत काहीच फरक पडत नाही...या निराशाजनक परिस्थितीत...सर्वसामान्यांना व भटक्या-विमुक्तांनाही रोज नव्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे विमुक्त जातींनाच नाही, तर इतर सर्वांनाच ‘का कराचं शिकून’? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही, हेच खरं.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
84
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9789395477284
समुदायाने जोडले
बंद