माझे शेल्फ
अधिक प्रभावी संवाद
"सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात व्यावसायिक वातावरणात काम करताना उच्च दर्जाच्या संभाषण कौशल्याची गरज भासू लागली. अशावेळी संभाषणाच्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्या तर अधिक कौशल्यपूर्ण संभाषण आत्मसात करणे सोपे होईल. त्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते. या पुस्तकात, लेखक जे. व्ही विलानिलम (ग. त. तळश्ररपळश्ररा) हे लिखित आणि मौखिक संभाषणाचे महत्त्वाचे घटक असणारी व्यापक माहिती पुरवितात.
संभाषणातील मूलभूत तत्त्वांच्या रुपरेषेनंतर लेखक, लिखित संभाषणबाबत चर्चा करतात. यात अहवाल, कार्यक्रमपत्रिका, इतिवृत्तान्त आणि बहिर्गत पत्रव्यवहार यांचा समावेश आहे. यानंतर मौखिक किंवा तोंडी संभाषणावरील प्रकरण आहे ज्यात सार्वजनिक भाषण आणि समूह चैतन्य यांचा समावेश आहे. त्यापुढचे प्रकरण, हे दृक-श्राव्य साधने आणि मल्टिमिडिया सादरीकरण या महत्त्वाच्या विषयांचे आहे. शेवटच्या प्रकरणात डॉ. विलानिलम यांनी, व्यावसायिक आणि औद्योगिक संभाषणात माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग यावर चर्चा केली आहे.
पुस्तकाची विशेष आकर्षणे पुढील प्रमाणे आहेत :
श्र फॅक्स, ईमेल, इंटरनेट यासारख्या, व्यावसायिक संभाषणातील आधुनिक तंत्रांविषयीच्या माहितीचा समावेश.
श्र पाच उपयुक्त अशा पुरवण्या ज्यामध्ये, वारंवार चुकीचे स्पेलिंग केले जाणारे शब्द, नेहेमी गोंधळात टाकणार्या शब्दांचे अचूक उपयोग, वाक्य-दुरुस्ती यांचा समावेश.
श्र संपूर्ण पुस्तकात, वापरण्याच्या पद्धतीबाबतच्या अनेक उदाहरणांचा समावेश.
श्र संभाषणाच्या संदर्भात, संभाषणाच्या वैश्विक प्रारूपाबाबतची (णचउ) चर्चा.
श्र व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक अहवाल तयार करण्याबाबतची पायरी-पायरीने
दिलेली माहिती.
श्र विविध प्रकारच्या वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे आवश्यक ते मार्गदर्शन करणारे ठरेल. यात सर्व स्तरांवरील व्यवस्थापक, पत्रकार, तांत्रिक लेखक, प्रसारमाध्यमातील व्यक्ती
आणि संशोधक यांच्याबरोबरच व्यावसायिक संभाषण आणि जनसंपर्क या क्षेत्रातील
व्यावसायिकांचाही समावेश आहे. औद्योगिक संभाषण, तांत्रिक संभाषण आणि
पत्रकारिता यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी एक चांगले पाठ्यपुस्तक म्हणूनही हे उपयुक्त
ठरेल.
श्र डॉ. जे. व्ही. विलानिलम हे पूर्वी केरळ विद्यापीठाचे उप-कुलगुरू (तळलश - लहरपलशश्रश्रेी)
होते, त्याच विद्यापीठातील, संभाषण आणि पत्रकारिता या विभागाचे व