मुखपृष्ठ
मानसशास्त्रीय चाचण्या परिचय

माझे शेल्फ

मानसशास्त्रीय चाचण्या परिचय

सारांश

"मानसशास्त्रीय चाचण्या
हे मानवी वर्तन समजावून घेण्यासाठीचे एक वस्तुनिष्ठ व प्रमाणित असे साधन आहे. म्हणजेच अशी चाचणी ही व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठीची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे.
काही पालक आपल्या अपत्याच्या व्यक्तिमत्त्वविकासाची फारच काळजी घेतात. ४-५ वर्षाच्या मुलाचे मानसशास्त्रीय परीक्षण करून त्याची बुद्धी, अभिरुची, क्षमता तपासून घ्यावी व त्यानुसार त्याचे व्यक्तिमत्त्व घडवावे असे त्यांना वाटते. हा विचार फारच आदर्श आहे. पण अशा पालकांना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज असते.
मानसशास्त्रीय चाचण्या या फूटपट्टीसारख्या नाहीत. ते ‘रेडिमेड गाईड’नाही याचे भान निर्माण करावे लागते. मानसशास्त्रीय चाचण्यांचे व्यवहारात अनेकविधप्रकारे उपयोग करून घेतले जातात. शैक्षणिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, वैवाहिक क्षेत्र, विकृतांचे क्षेत्र, संशोधन क्षेत्र... अशी जी महत्त्वाची मुख्य क्षेत्रे आहेत, तेथे चाचण्यांची उपयुक्तता आहे.
त्यामुळे मानसशास्त्रीय चाचण्यांचा शिरकाव कुठेही थांबविता येणे शक्य नाही. जिथे मनुष्य आहे, जिथे काही मार्गदर्शनाची गरज आहे, तिथे चाचण्यांची उपस्थिती अनिवार्य आहे.
म्हणूनच या विषयाचा परिचय करून देण्याचे काम हे पुस्तक करते."

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2008
पृष्ठसंख्या
198
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
220.00
ISBN
9788184830507
समुदायाने जोडले
बंद