मुखपृष्ठ
Ladhe aani Tidhe – Chikitsak Gappa Pushpabainshi

माझे शेल्फ

Offer-2 -Sanwad, Symphony Anarth

इंग्रजी शीर्षक
Offer-2 -Sanwad, Symphony Anarth
सारांश

कापूसकोंड्याची गोष्ट

पश्‍चिम विदर्भाची ‘कापसाचा प्रदेश’ ही ओळख खरी नाही; ब्रिटिशांच्या वसाहतवादी नफेखोर धोरणाने निर्माण झालेली आहे. ब्रिटिश येण्याआधी गवताळ माळरानं, स्थानिक लोकसमुदायांनी जोपासलेले शेतीपूरक पशुधन, वातावरणाचा विचार करून निवडलेली पिकपद्धती, योग्य पाणी-व्यवस्थापन आणि वनांचे अस्तित्व याबाबत वर्‍हाड समृद्ध होता. या भागातल्या निसर्ग, भूगोल, वातावरण या घटकांच्या अनुभवाधारीत समजुतदारपणाच्या आणि प्रयोगांच्या भरवशावर स्थानिकांनी एक परस्परावलंबनाची व्यवस्था निर्माण केली. पेन्सिल्वेनिया विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असणार्‍या डॉ. लक्ष्मण सत्या यांनी या पुस्तकात उपलब्ध माहितीसंग्रहाच्या आधारे ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांमागची प्रेरणा, त्यांची अंमलबजावणी आणि स्थानिक लोकजीवन, निसर्ग आणि पशुधन यांच्यावर झालेले विपरीत परिणाम यांची अव्यक्त कथाच वाचकांसमोर ठेवली आहे.शेतकरी, अभ्यासक, पत्रकार, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि शिक्षक अशा सर्वांसाठीच हा वसाहतकालीन धोरणांचा लेखाजोखा महत्त्वाचा तर आहेच, परंतु आजच्या समस्यांबाबत दिशादर्शकही आहे.

कहाणी मानवप्राण्याची

ऐक मानवप्राण्या, तुझी कहाणी

तू घडलास कसा?

मूठभर होतास संख्येनं. लाखभर वर्षांमध्ये सातेक अब्ज झालास.

दोनशे देश, हजारो भाषा, शेकडो लिप्या, अगणित तंत्र आणि शास्त्र

हे ‘एका’चं ‘अनेक’ होणं – हीच तुझी कहाणी

प्रश्‍न सोडवत इथपर्यंत आलास.

दर पावलाला नवे प्रश्‍न उत्पन्न केलेस.

‘माणुसकी’ म्हणजे काय?

‘अमानुषता’ कशात असते?

पदोपदी या प्रश्‍नांना सामोरा जातो आहेस – कधी जाणीवपूर्वक, फारदा अजाणताच.

पाहा तर, स्वत:ची कहाणी – उत्तरं शोधायला!

वारूळ पुराण

जगातला सर्वांत थोर कीटकशास्त्रज्ञ लिहितो आहे एक कादंबरी.

पहिली पातळी वारुळाची, दुसरी त्याचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञाची,

तिसरी संपूर्ण जीवसृष्टीची, माणसाला त्याची जागा दाखवून देणारी.

या कादंबरीच्या संक्षिप्त भाषांतराच्या निमित्ताने लिहितो आहे

भारतातला अग्रगण्य परिसरशास्त्रज्ञ.

कादंबरीतल्या ‘तिहेरी’पणाला समांतर एक ‘तिपेडी’;

जनुक, स्मरूक आणि निर्मुक.

आणि ही एक मर्मदृष्टी झाली.

सर्व जीवसृष्टीची जडणघडण तपासत, पोत तपासत

निसर्ग आणि मानव यांच्या संबंधाची समृद्ध, सर्वंकष पाहणीही इथं भेटेल,

श्रीमंत, प्रासादिक भाषेतून.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
1540
भाषा
मराठी
किंमत
847.20
ISBN
978-93-2