माझे शेल्फ
तर्किष्ट,तर्कटपंजरी आणि आम्ही दि ब्राईट्स
1)तर्किष्ट
प्राजक्ता अतुल
Doubt is the origin of Wisdom’ असे René Descartes ने म्हटले आहे.
अर्थात ‘शहाणपणाची सुरुवात शंका घेण्यातून होते.’ आणि शंकेचे निराकरण करायचे तर,
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बळ हवे. डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांनी आपल्या एका लेखात हे अतिशय समर्पकपणे मांडले आहे. ते म्हणतात,
भवतालच्या परिस्थितीत भौतिक कारणे शोधा. जिथे जिथे ती अपुरी ठरतील, त्या त्या जागा रिकाम्या ठेवा.
दैवी व दानवी बुजगावण्यांनी त्या भरून काढू नका. प्रयत्न आणि संशोधन सुरू राहू द्या. काही कारणे नव्याने समजतील. नवी तावून सुलाखून घ्या. जुनी कारणे त्यागून नव्याने जागा भरा. यथावकाश काही जागा भरल्या जातील, काही नाहीच भरता येणार. त्या रिकाम्या जागांसाठी संशोधन जारी ठेवा. “
2)तर्कटपंजरी
मनातील भीती, प्रसंगी कमकुवत होणे, कुटुंबातील रूढिप्रियतेचा कष्टपूर्वक केलेला विरोध उघडपणे व्यक्त करणे सोपे नसते.
अशात, हे धाडस करणाऱ्या अनेकांची ही ‘तर्कटपंजरी’.
3)आम्ही दि ब्राईट्स
हे ब्राईट्सचे पहिलेच प्रकाशन. “तुम्ही एकटे नाही, तुमच्यासारखा विचार करणारे अनेक आहेत” ह्याची जाणीव करून देण्यासाठी brights’ Society समूहाची स्थापना झाली. अज्ञेयवादी, नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी, धर्महितवादी, मानवतावादी, इ. अनेक विचारधारांमध्ये संवाद निर्माण करणे आम्हाला आवश्यक वाटले. हे पुस्तक म्हणजे अशा विचारांचे संकलन.