मुखपृष्ठ
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ

माझे शेल्फ

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ

सारांश

"प्राचीन भारतातील समाज, धर्म हे सुसंस्कृत व सभ्य मानले जात होते, परंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडून १९व्या शतकापर्यंत त्यात विघातक बदल घडून आले. परिणामी पारतंत्र्य आलेच, परंतु स्त्री व शूद्रांचे साधारण मानवी अधिकारही तत्कालीन धार्मिक व्यवस्थेने नाकारल्याने समाजाची सर्वांगीण प्रगती खुंटली.
अशा परिस्थितीत व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक व धार्मिक बंधनांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धिप्रामाण्यवाद या पाश्‍चात्त्य विचारांची इंग्रजी शिक्षणाद्वारे ओळख झाल्याने भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी जवळजवळ शतकभर यासाठी कार्य केले व त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकांत प्रामुख्याने वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते.
प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्‍चितच मदत होईल.
"

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
400
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
350.00
ISBN
9788184835434