मुखपृष्ठ
द हंगर गेम्स

माझे शेल्फ

द हंगर गेम्स

सारांश

एके काळी उत्तर अमेरिका म्हणून ओळखल्या जाणार्या ठिकाणाच्या उद्ध्वस्त, भग्न अवशेषांमध्ये आता पॅनम नावाचं राज्य वसलं आहे. ऐश्वर्याने नटलेल्या कॅपिटॉलभोवती बारा डिस्ट्रीक्ट्स आहेत. कोणे एके काळी या डिस्ट्रीक्ट्सनी कॅपिटॉलविरुद्ध बंड पुकारलं होतं, पण ते युद्ध हरले. शरणागतीच्या शर्तीपोटी प्रत्येक डिस्ट्रीक्टने ‘हंगर गेम्स’ नावाच्या वार्षिक कार्यक्रमात एक मुलगा आणि मुलगी पाठवण्याचं मान्य केलं.
‘हंगर गेम्स’ म्हणजे टीव्हीवर प्रक्षेपित होणारा वेगवेगळ्या डिस्ट्रीक्ट्समधल्या मुलामुलींचा आमरण लढा! अशाच डिस्ट्रीक्ट्सपैकी एका डिस्ट्रीक्टमध्ये कॅटनीस एव्हरडीन नावाची सोळा वर्षांची मुलगी तिाी आई आणि लहान बहिणीबरोबर राहत असते. जेव्हा अपरिहार्य परिस्थितीमुळे तिला हंगर गेम्समध्ये भाग घ्यावा लागतो, तेव्हा तिला ती मृत्युदंडाची शिक्षाच वाटते. हंगर गेम्सचं ठिकाण, नियम आणि प्रेक्षकांचा सहभाग हे सारंच अनिश्चित असलं, तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे : मारा नाहीतर मरा.
कल्पनारम्य कथानक असलेली ही कादंबरी अतिशय वेगवान आणि भविष्यवेधी आहे. तसंच जगभरातल्या कुमारवर्गानं ही कादंबरी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. कादंबरीचा वेग, तिचं भीती वाढवत नेण्याचं कौशल्य, तिच्यातला थरार, समवयस्कांची संवेदनशीलता हे सर्व नक्कीच खिळवून ठेवणारं आहे. त्यामुळे ती केवळ एखादी भाषा किंवा प्रदेशापुरती मर्यादित राहत नाही, तर हर प्रकारच्या वाचकाला भावते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
328
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
300.00
ISBN
9788184834918