मुखपृष्ठ
डायमंड वाणिज्य कोश खंड 1 ते 5

माझे शेल्फ

डायमंड वाणिज्य कोश खंड 1 ते 5

सारांश

वाणिज्य हा शब्द जरी बोजड वाटला , तरी सद्य:पिरस्थितीत तो सर्वमुखी झाला आहे. कारण एकूण ‘अर्थकारणालाच’ सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणूनच या विषयाचे महत्त्व विचारात घेऊन अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी , तसेच व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्यकोशाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी किंवा मराठी वर्णमालेनुसार केलेली संज्ञांची रचना म्हणजे कोश , अशी कोशाबाबत आपल्या सर्वांची सर्वसाधारण धारणा असते ; परंतु प्रस्तावित वाणिज्यकोशाचे स्वरूप यापेक्षा पूर्णत: भिन्न ठेवण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती विनायास मिळावी , हा या रचनेमागचा प्रमुख हेतू आहे. या कोशामध्ये वाणिज्य या विषयाचे एकूण ३४ प्रकरणांमध्ये (सोबत प्रकरणांची नावे दिलेली आहेत) विभाजन करण्यात आले आहे. अ , इ , उ , ऊ या वर्णमालेनुसार येणार्या संज्ञा , उपसंज्ञा , त्यांचे स्पष्टीकरण , सिद्धान्त , तुलना इ. बाबींनी प्रत्येक प्रकरण पिरपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच आवश्यक तेथे प्रकरणाच्या शेवटी पिरिशष्टेही देण्यात आली आहेत. प्रस्तुत कोशाचे लेखनकार्य , संपादन , पडताळणी व पुर्नमूल्यांकन अशा विविध बाबींसाठी तीन वर्षांपेक्षा जास्त अवधी लागला असून या काळात वाणिज्य विषयाशी संबंधित असणाऱ्या अनेक नामवंत प्राध्यापकांचे साहाय्य कोशासाठी लाभले , हीच या कोशाचा दर्जा सिद्ध करणारी बाब ठरावी , असा विश्वास वाटतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
7200.00
ISBN
9788184834987