महागाथा
ब्रह्मा आणि विष्णू यांनी एकमेकांबरोबर शर्यत लावली होती, ही कहाणी ऐकलीय? किंवा शिवाने कृष्णाशी युद्ध केलं होतं, ही कहाणी? किंवा इंद्राने भ्रूणहत्या करण्याचा प्रयत्न केला होता ही कहाणी? माया सीतेविषयी, नारदाच्या माकड तोंडाविषयी कधी ऐकलंय का? सूर्य आकाशातून खाली का पडला किंवा चंद्राने व्यभिचार का केला, हे माहीत आहे का?’
हिंदू धर्मामधील पुराणांमध्ये विश्वामधील ज्ञानभंडार सामाबल आहे. सातत्याने उत्तरं शोधणाऱ्यांसाठी पुराणकथांचं महत्त्व कालातीत आहे. ह्या प्राचीन ग्रंथामधील शंभर निवडक पौराणिक कथांची सचित्र संकलित आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. देव, असुर, ऋषी आणि सम्राट ह्यांच्या लोकप्रिय कथा या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्या आहेतच, पण लेखक सत्यार्थ नायक यांनी फारशा ज्ञात नसलेल्या अनेक कहाण्यांचा शोध घेऊन, त्याचाही अंतर्भाव यात केला आहे. उदाहरणार्थ, विष्णूचा शिरच्छेद; सरस्वती लक्ष्मीला शाप देते, तसंच हरिश्चंद्र वरुणदेवाला फसवतो… या आणि यासारख्या कथा फारच कमी लोकांनी ऐकल्या असतील. सत्यार्थ नायक यांनी ह्या शंभर कहाण्याची कालक्रमानुसार मांडणी करून त्या ‘नव्या’ स्वरूपात सादर केल्या आहेत. सत्ययुगामधील विश्वनिर्मितीपासून सुरू झालेल्या कथांची अखेर कलियुगाच्या आगमनाशी होते. पौराणिक सदर्भ देत त्यांनी चार युगांचा मोठा आवाका असलेल्या बेगबान कथनाची वेधक बांधणी केली आहे. एकूणएक कथा या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. ब्रह्मांडामध्ये घटनांची विलक्षण अशी एक साखळी दिसून येते. प्रत्येक घटनेला एक पार्श्वभूमी आहे. वर्तमानकाळ हा भूतकाळाला आणि भविष्यकाळाला जोडलेला असतो. कारण आणि परिणाम यांची अखंड साखळी त्यात आहे.
कर्म आणि कर्मफलाच वर्तुळ पूर्ण होत.
Ashutosh Garg
Remove term: Mahagatha Mahagatha
Remove term: Satyarth Nayak Satyarth Nayak
Remove term: आशुतोष गर्ग आशुतोष गर्ग
Remove term: उल्का राऊत उल्का राऊत, ulka raut
Remove term: महागाथा महागाथा
Remove term: सत्यार्थ नायक सत्यार्थ नायक, ( १०० ,100, puranatil 100 katha , पुराणातील १०० कथा , महागात ,महा , mahaa , ulkaa raut , गाथा , पुरणाची , )
महागाथा
पुराणातील १०० कथा
सत्यार्थ नायक
Click the image to edit or update
Remove product image
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication