मुखपृष्ठ
लोकशाहीचे वास्तव

माझे शेल्फ

लोकशाहीचे वास्तव

सारांश

भारत हा एक अभिमान वाटावा, असा संसदीय लोकशाहीचा देश आहे, ज्याला कधीही लष्करी बंडखोरीला सामोरं जावं लागलेलं नाही. शेजारच्याच देशांमध्ये अशी बंड नेहेमीच होत असताना आणि तिथे संविधानाला फारसं महत्त्व दिलं जात नसताना, या देशात ‘असं न होण’ हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पण, आता अनेक दशकांपासून भारतीय लोकशाहीचा पाया खिळखिळा होत चाललेला आहे. नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात, देशाला ‘अंशतः स्वतंत्र’ असं मानांकन मिळालं आहे, तर आणखी एका सर्वेक्षणातून ती ‘मतपेटीतली हुकूमशाही’ आहे असं नोंदवलं गेलेलं आहे.

जोजी जोसेफ यांनी या घसरणीचा शोध घेतला आणि त्यातून त्यांनी एक निष्कर्ष काढला : दहशतवादाची हाताळणी करण्याच्या प्रक्रियेमुळे संपूर्ण यंत्रणा उसवलेली आहे. १९८० आणि १९९०च्या दशकांमध्ये भारतभर बंडखोरीची लाट उसळली आणि ती हळूहळू पसरत गेली. तिच्याशी दोन हात करताना संपूर्ण संरक्षणयत्रणेला संघर्ष करावा लागला त्या लाटेखाली गुदमरून गेल्यामुळे पोलीस दल, गुप्तवार्ता यंत्रणा, केंद्रीय तपासयंत्रणा, कर विभाग आणि इतर यांनी काही अभिनव कल्पना शोधून काढल्या; ज्यांच स्वरूप कधीकधी भयानकही होत : खोटे किंवा काल्पनिक पुरावे तयार करण्यापासून दहशतवादी हल्ले करणं आणि चक्क दहशतवादी संघटना तयार करण्यापर्यंत ही मजल गेली. कालांतरानं, दहशतवाद म्हणजे भरभराटीचा, अनेक कंगोरे असलेला एक धंदा झाला.

काश्मीरमधल्या दहशतवादापासून श्रीलंकेतल्या नागरी युद्धापर्यंत, मुबईवर झालेल्या हल्ल्यापासून ईशान्य भारतात अनेक दशकं सुरू असलेल्या बडखोरीपर्यंत, भारताच दहशतवादाशी युद्ध सुरूच आहे. त्यामुळेच, देशाची संरक्षणयंत्रणा अधिकाधिक राष्ट्रबादी आणि अराजकतावादी झालेली आहे, आणि भ्रष्टदेखील. यातला सगळ्यांत धोकादायक भाग असा, की गुप्तचर यंत्रणा, पोलिस दल, गुप्तवार्ता विभाग यासह जवळपास संपूर्ण संरक्षण यंत्रणा ही राजकारण्यांच्या हातात गेलेली आहे.


Remove term: Josy Joseph Josy Joseph
Remove term: lokshahiche vastav lokshahiche vastav
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: The Silent Coup The Silent Coup
Remove term: जोजी जोसेफ जोजी जोसेफ
Remove term: पूनम छत्रे पूनम छत्रे
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: लोकशाहीचे वास्तव लोकशाहीचे वास्तव  ( bhartiy  lokashahi  yantranacha paddhyaadch na disanaraa khara chehara , भारतीय लोकशाही यंत्रणाचा ,   वास्तव ,  द सायलंट कौप , sayalent kap cup , jozy,  josef ,)

लोकशाहीचे वास्तव

भारतीय लोकशाही-यंत्रणांचा पडद्याआडचा न दिसणारा खरा चेहरा

जोजी जोसेफ

अनुवाद : पूनम छत्रे

मधुश्री पब्लिकेशन

lick the image to edit or update

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
253
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
9789391629632