बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र
प्रत्येक व्यक्तीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार हितावह असतो का? गरीब राष्ट्रांमधून आलेले स्थलांतरित स्थानिक लोकांच्या रोजगारावर पायबंद घालतात का? जगभर सर्वत्र आर्थिक विषमतेचा विस्फोट का होत आहे? साधनसंपत्तीच्या फेरवाटपामुळे माणसाच्या मनातील काम करण्याच्या प्रेरणांची पायमल्ली होते का? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रसाराचा आनंद मानावा की त्याची काळजी करावी ? हवामानबदल आणि आर्थिक विकास या दोन गोष्टींमध्ये आपण संतुलन कसे राखायला हवे? पाश्चिमात्य देशांत यापुढे आर्थिक विकास होणारच नाही का? त्याची आपण चिंता करायला हवी आहे का ?
आपल्यासमोर असलेल्या ज्वलंत आर्थिक समस्या कशा प्रकारे हाताळायला हव्यात हे आज एक मोठे आव्हान आहे. अंतराळातील प्रवास कसा करावा यापेक्षा किंवा कॅन्सरसारख्या रोगावर मात कशी करावी, या समस्यांना भिडण्याच्या आव्हानापेक्षा हे आव्हान गंभीर स्वरूपाचे आहे. कारण या सर्व आर्थिक समस्यांमुळे चांगल्या दर्जाच्या आयुष्याची कल्पनाच पणाला लागली आहे. कदाचित उदारमतवादी लोकशाहीही पणाला लागली असेल. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे साधनसंपत्ती आहे; पण आज आपल्यामधे मोठ्ठी दरी पडली आहे. आपसातील मतभेदांची आणि परस्पर अविश्वासाची उंच भिंत ओलांडण्याइतकी मोठी झेप घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कल्पनांची आपल्याकडे वानवा आहे. या समस्येचे उत्तर शोधण्यास आपण मनापासून भिडलो, जगभरातील सहृदय, सर्वोत्तम माणसे विविध देशांच्या सरकारांसाठी काम करू लागली आणि समाजही या दृष्टीने विचार करू लागला तर हे शक्य होईल. सार्वजनिक उपक्रम अधिक परिणामकारक व्हावे आणि राजकीयरीत्या व्यवहार्य व्हावेत अशा रीतीने त्यांची पुनर्रचना करण्याचा आपण प्रयत्न केला तर इतिहास या युगाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करेल.
Remove term: Abhijeet Bannerjee Abhijeet Bannerjee
Remove term: bikat paristhitisathi uttam arthashastra bikat paristhitisathi uttam arthashastra
Remove term: Esther Dfulo Esther Dfulo
Remove term: Good Economics for Hard Times Good Economics for Hard Times
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: अनघा केसकर अनघा केसकर
Remove term: अभिजीत बॅनर्जी अभिजीत बॅनर्जी
Remove term: एस्थर डफ्लो एस्थर डफ्लो
Remove term: बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन