मुखपृष्ठ
द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ

माझे शेल्फ

द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ

सारांश

मनुष्य आहे तर तो चुका करणारच आणि त्याच्यात उणीवा असणारच या पायोवरच मॅन्सनचा पूर्ण युक्तिवाद उभा आहे. तो म्हणतो, “सगळेच खास कसे असणार? कोणी एक जिंकत असेल, तर हरणाराही कोणीतरी असेलच ना? मला माहितिये, की हा विचार तुम्हाला आवडलेला नाही आणि त्यात तुमची चूकही नाही.” मॅन्सन आपल्याला आपल्या मर्यादा जाणून घ्यायचा आणि त्या मान्य करण्याचा सल्ला देतो. त्यानेच तुमचं भलं होऊ शकेल असं तो म्हणतो. आपल्याला एकदा का आपल्या भीती, उणीवा, दोष आणि अनिश्चितता यांना पार करून पुढे जाता आलं, आपण त्यांच्यापासून पळ काढण्याचा किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न धांबवला आणि आपण आपल्या आयुष्यातील कटू सत्यांना जिगरबाजपणे सामोरे जायला शिकलो, की आपल्यात आपोआपच आयुष्य जगण्याचं बळ आणि आत्मविश्वास येतो.

आपल्याला एकच आयुष्य मिळालं आहे, त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या गोष्टी कमीच ठेवायला शिकलं पाहिजे, आता त्या गोष्टी कोणत्या, याची निवड जाणीवपूर्वक आणि नीट विचार करून झाली पाहिजे, मॅन्सनच्या या जरा-इथे-समोर बस-आणि माझ्याकडे-बघ-मला-तुझ्याशी- बोलायचंय पद्धतीच्या लिखाणात विस्मित करणाऱ्या अनेक घटना आहेत, अरे! हे काय! असं म्हणायला लावणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचं लिखाण कोणीतरी थोबाडावर थंड पाण्याचा हबकारा मारावा आणि खडबडून जाग करावं असं वाटतं, पण ते तुम्हाला आयुष्य अधिक समाधानाने जगायचंही बळ देतं.


Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Mark Manson Mark Manson
Remove term: The Subtle Art Of Not Giving A F*ck The Subtle Art Of Not Giving A F*ck, satal atr of , sutal art of
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: मार्क मॅन्सन मार्क मॅन्सन
Remove term: श्रद्धा भोवडद सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ श्रद्धा भोवडद ,सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ

घंटा फरक न पाडून घेण्याची बेमालूम कला

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
214
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9788193561188