मुखपृष्ठ
मालटेकडीवरून

माझे शेल्फ

मालटेकडीवरून

सारांश

गद्याचे खास वैशिष्ट्य साकार करणारे वैचारिक / सामाजिक चिंतनाचे संभाषित आहे, सर्व संभाषितांचा कायापालट करणारे उपरोधाचे संभाषित आहे, वास्तवकथनासाठी आवश्यक असणारे संभाषित आहे, वास्तव्य प्रश्नांकित करणारे विविध प्रश्न विचारणारे संभाषित आहे आणि कवितेचेही संभाषित आहे. विविध संभाषितांच्या गुंफणीने डाक्यांच्या या लेखनाचा पोत समृद्ध झाला आहे.

डहाक्यांच्या ‘मालटेकडीवरून’मधल्या लेखनाची ही वैशिष्ट्ये काळजीपूर्वक न्याहाळली की ती कादंबरी या साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये आहेत, ही गोष्ट लक्षात येते. डहाके मराठीतील प्रथितयश कवी आहेत. ते समीक्षाही लिहितात. त्यांनी दोन कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. असे असले तरी त्यांनी त्यांच्यातील कादंबरीकाराच्या क्षमतेला पुरेसा न्याय दिला नाही, अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार करता येईल. निदान माझी तरी आहे. ‘वाङ्मयवृत्त’ मध्ये ‘मालटेकडीवरून’ हे सदर प्रकाशित होऊ लागल्यानंतर त्यांचे कादंबरीशी असलेले आंतरिक नाते लक्षात येऊन मला स्वतःला खूप आनंद झाला. अशा छोट्या छोट्या कादंबऱ्यांबरोबर आता त्यांनी खरीखुरी, मोठी कादंबरी लिहावी असे मला आणि डहाक्यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या सर्व वाचकांना वाटेल.

काय सांगावे? डहाके पुन्हा कादंबरीकडे वळतीलही. तसे ते वळले तर त्यांनी ‘मालटेकडीवरून’ सोडलेला संकल्प सिद्धीस गेला असे आपल्याला म्हणता येईल.

– हरिश्चंद्र थोरात

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
152
भाषा
मराठी
किंमत
150.00