गोष्ट : न सांगता येण्याविषयीची
सारांश
समाजव्यवस्थेत दडपल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या छातीत एक गोष्ट कोंडलेली असते, एक गाणं बंदिस्त झालेलं असतं. गोष्ट सांगणं, गाणं म्हणणं म्हणजे ‘मुक्या’ स्त्रीने ‘बोलकं’ होणं. समाजाने या गोष्टीसाठी, गाण्यासाठी मुक्त अवकाश निर्माण केला पाहिजे.
गोष्ट सांगितली गेलीच पाहिजे, नाहीतर ती वाटेल त्या रीतीने बाहेर येते, दडपून ठेवणाऱ्या व्यक्तीचा (आणि समाजाचाही) सूड घेते. हजारो व्यक्तींच्या मनात त्यांच्या गोष्टी दडपून, माना मोडून पडलेल्या असतील. गाणी आतल्याआत कसमसत असतील.