Ujed-Andharacha Abhal (Firasti 2) : Uttam Kamble
आभाळ अनेक आकारांचं असतं... मोकळं आभाळ, पावसाच्या ढगांनी भरलेलं आभाळ, वांझोटे ढग गोळा करणारं आभाळ, इंद्रधनुष्याचे रंग घेऊन चकाकणारं आभाळ, कोणत्याही क्षणी डोक्यावर कोसळणारं आभाळ वगैरे वगैरे...
डोक्यावर सतत तोल सावरत राहिलेल्या आभाळाला माणसानं किती किती नावं दिली आहेत...
फिस्स्ती करताना मलाही वेगवेगळी आभाळं बघता आली व माणसांच्या जगातलं आभाळ... ते कधी वेदनेनं भरलेलं तर कधी मस्तीत आलेल्या मोराला नाचण्यासाठी जागा देणारं... ते कधी कोडानं भरलेलं तर कधी सौंदर्यस्पर्धेत जाऊन आल्यासारखं... कधी फक्त उजेडानं भरलेलं तर कधी आपल्या शरीरावर फक्त अंधार आणि अंधारच पांघरलेलं... वेगवेगळ्या प्रकारचं आभाळ घेऊन जगत आहेत माणसं...
अंधार म्हणजे दुसरं-तिसरं काहीच नसतं तर उजेडाचा असतो अभाव आणि उजेड काहीच वेगळा नसतो तर अंधाराचा असतो अभाव...
The sky has many forms… an open sky, a sky filled with rain clouds, a sky gathering barren clouds, a sky glowing with the colors of a rainbow, a sky that seems ready to collapse over our heads at any moment, and so on…
Humans have given countless names to the sky that constantly balances itself above us.
During my wanderings, I too have seen many kinds of skies—and the sky that exists within the world of people… sometimes filled with pain, sometimes offering space for a carefree peacock to dance… at times full of riddles, at times as if it has returned from a beauty contest… sometimes filled only with light, and at other times wrapped entirely in darkness… People live their lives under such varied skies.
Darkness is nothing else but the absence of light, and light is nothing else but the absence of darkness.