Kaljat Dhavtoy Sasa (Firasti-4)
काळजात धावतोय ससाउत्तम कांबळे यांनी लिहिलेल्या ‘काळजात धावतोय ससा’ या लेखसंग्रहात आजच्या काळातल्या आतून-बाहेरून असुरक्षित असणाऱ्या माणसाचं मनोदर्शन आहे. स्वत:च्या सावलीला देखील भिणाऱ्या सशाची अशी मानसिकता कशामुळे झाली असावी, याचा धांडोळा लेखकानं वेधकपणे घेतला आहे. भोवतालची व्यवस्था, पर्यावरण व आयुष्य तुडवायच्या साऱ्याच वाटा माणसाच्या मनात धावणाऱ्या सशाला घाबरवू लागल्या आहेत. आपल्या प्रखर सामाजिक जाणिवांनी ओतप्रोत लेखनानं वाचकांना खडबडून जागं करण्याचं कांबळे यांचं व्रत वर्तमानात आवश्यकच आहे.
'गांधी आणि आर्टकल्चर,' 'पुन्हा एकदा दुष्काळ,' 'कर्ज चुकवायचंय, उघडा दरवाजा,' व 'मरणाच्या भरपाईची सावली' यांसारख्या लेखांमधून कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व अगतिकता संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे.
A Hare Running in the Heart
In the essay collection “A Hare Running in the Heart,” Uttam Kamble presents a deep psychological portrayal of the modern human being who feels insecure both internally and externally. The author thoughtfully explores what might have led to such a fearful state of mind—like that of a hare that is afraid even of its own shadow. The surrounding system, environment, and the many harsh paths of life have begun to frighten the “hare” running within the human mind.
Through his writing, filled with strong social awareness, Kamble aims to awaken readers and shake them into awareness—something that feels especially necessary in today’s times.
In essays such as “Gandhi and Art Culture,” “Once Again, Drought,” “I Must Repay the Debt—Open the Door,” and “The Shadow of Compensation for Death,” he sensitively expresses the contradictions of modern life, the inescapable intensity of suffering, and the helplessness experienced by individuals.