परीक्षण
कॉलनी
सिद्धार्थ पारधे या साहित्य सहवासच्या आधाराने वाढलेल्या प्रगल्भता आलेल्या लेखकाचे हे मनोगत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झगडून यश मिळवल्याचीही ही गाथा आहे. निव्वळ माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेला झगडा मनाला चटका लाऊन जातो. वैयक्तीक स्वच्छतेसारख्या गोष्टीही माणसाला मुंबई सारख्या इतक्या मोठ्या शहरात मिळत नाहीत. झोपडीतले आयुष्य आणि तेथे भरती ओहोटीमुळे झोपणेही अशक्य झाल्याने अनेक रात्री जागून काढलेल्या अश्या परिस्थितीत केलेला अभ्यास, आई वडिलांची परिस्थिती कथन करणारे अत्यंतिक प्रामाणिक पुस्तक आहे. पारधे या आडनावामुळे आलेले अनुभव तसेच लहानपणी माणूस म्हणूनही नाकारले जाणे आणि निव्वळ कॉलनी राहण्यासाठी सिद्धार्थची झालेली तडफड ही भयंकर आहे. सामाजिक स्विकार तर दूरचीच गोष्ट आहे. पुस्तकातली अनेक प्रकरणे तत्कालीन समाजाच्या मानसिकतेवरही बोट ठेवतात. जाती आणि इतर उतरंडींमध्ये समाज किती अडकून पडला आहे याची जाणीवच हे पुस्तक करून देते.
तरीही मित्र म्हणून सचिन तेंडुलकरसह, अनेक व्यक्तींनी किती मोलाचे योगदान दिले आहे, याचा उल्लेखही अतिशय आनंदाने पारधे या कथनात करतात.
मनाला उभारी देणारे काही वाचायचे असेल तर हे पुस्तक विपरीत परिस्थितीत प्रेरणा देणारे असू शकेल हे नक्की!
मनोगतात लेखक पारधे म्हणतात, 'ह्या ठिकाणी माझे अनुभव जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न एवढ्याचसाठी आहे की, माझे अनुभव वाचून कदाचित समाजात दडलेला अजून एखादा सिद्धार्थ समाजासमोर यावा एव्हढीच इच्छा.'
पुस्तकाला विंदांनी दिलेल्या शुभेच्छा त्यांच्या हस्ताक्षरात मलपृष्ठावर छापल्या आहेत.
त्याचवेळी पुस्तक वाचल्यावर लेखक 'कॉलनी म्हणजे काही विशेष' या मानसिकतेत आता उगाच अडकून पडला आहे असे वाटले. सामाजिक परिस्थिती आणि संदर्भ बदलल्यावर त्यातून बाहेर यायला आता काही हरकत नाही. पण हा कदाचित मोठा प्रवासही असू शकतो याची जाणीव मला आहे.
आपला
गुंडोपंत
अभिप्राय
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Sat, 10 Jul 2010 - 20:49
या पुस्तकाबद्दल मी आधी पुस्तकविश्ववर ईथे लिहिले आहे
गुंडोपंत
गुंडोपंत · Mon, 12 Jul 2010 - 07:29 · उत्तर
अरे?
असे कसे काय झाले?
मी शोध घेतला तेव्हा हे पुस्तक आले नाही... काही तरी लोच्या आहे किंवा माझा धांदरटपणा झाला असणार.
असो,
तुझे परिक्षणही छान झाले आहे. इतरांचे प्रतिसादही चांगलेच आहेत.
आपला
गुंडोपंत
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 11 Jul 2010 - 06:15
छान परिचय. आवडला.
पुस्तकाच्या वैशिष्ट्यासह त्यातल्या चुकाही मांडणे हा पायंडा इथे अश्या परिचयांमुळे पडेल असे वाटते.