वर्णन
भोर तालुक्यातील 'श्री दत्त अँड कं.' या दुकानाचे रूपांतर १९५९ मध्ये नंदुरकर बंधूंनी पुण्यात अप्पा बळवंत चौकात 'अनमोल प्रकाशन' म्हणून केले. १९६२ मध्ये बी. डी. जोशी यांच्या 'M. Law' या पुस्तकाने प्रकाशनाला सुरुवात झाली. शालेय, धार्मिक, शेती, पाककला, ज्योतिष, बालसाहित्य व शब्दकोश अशा विषयांवरील ३,००० हून अधिक पुस्तके संस्थेने प्रकाशित केली असून १९९७ मध्ये केळवडे येथे स्वतःचा छापखाना सुरू केला.
संस्थापक: पद्माकर, माधवराव व मोरेश्वर नंदुरकर
स्थापना: 1959 (पुण्यात दुकान); पहिले प्रकाशन 1962
शहर: पुणे (बुधवार पेठ, अप्पा बळवंत चौक)
उल्लेखनीय पुस्तके: M. Law – बी. डी. जोशी (पहिले पुस्तक, 1962); इंग्रजी-इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी शब्दकोश – के. बी. विरकर; श्री स्वामी समर्थ – गोपाळबुवा केळकर
समुदायाने जोडले
बंद