मौज प्रकाशन गृह

शहर
मुंबई
स्थापना वर्ष
1950
वर्णन

मौज प्रकाशन गृहाचे पहिले पुस्तक १ ऑगस्ट १९५० रोजी प्रकाशित झाले. त्याआधी 'मौज' साप्ताहिक, 'सत्यकथा' मासिक आणि मौज प्रिंटिंग ब्युरो असे कार्यक्षेत्र होते; स्वतःचा छापखाना हे मौजचे वैशिष्ट्य. श्री. पु. भागवत यांनी १९५० ते २००७ या काळात संपादक-प्रकाशक म्हणून मराठी नवकथा-नवकवितेच्या प्रवाहाला दिशा दिली. संपादनाची शिस्त आणि दर्जा यासाठी मौज ओळखले जाते.

संस्थापक: भागवत बंधू; प्रमुख संपादक-प्रकाशक श्री. पु. भागवत. ('मौज' साप्ताहिक: अनंत हरि गद्रे, १९२२)

स्थापना: १९५० (पहिले पुस्तक १ ऑगस्ट १९५०); 'मौज' साप्ताहिक १९२२

शहर: मुंबई (खटाववाडी, गिरगाव)

उल्लेखनीय पुस्तके:

  • आमची माती, आमचं आकाश – अनंत काणेकर / दीनानाथ दलाल (पहिले पुस्तक)

स्रोत

समुदायाने जोडले
बंद