वर्णन
स्वातंत्र्याच्या पंधरा दिवस आधी, १९४७ मध्ये 'प्रसाद' मासिक व प्रसाद प्रकाशनाची स्थापना झाली; य. गो. जोशी, मामा दांडेकर व स. अ. जोगळेकर हे पहिल्या पिढीचे संस्थापक. धर्म, भारतीय संस्कृती आणि अध्यात्म या विषयांवर संस्थेने सुमारे ७५० पुस्तके प्रकाशित केली. सध्या तिसऱ्या पिढीतील डॉ. उमा बोडस मुख्य संपादक आहेत.
संस्थापक: य. गो. जोशी ('भाऊ'), संत सोनोपंत (मामा) दांडेकर, स. अ. जोगळेकर
स्थापना: 1947
शहर: पुणे (सदाशिव पेठ)
उल्लेखनीय पुस्तके: सुबोध ज्ञानेश्वरी; आपले वेद – आपली उपनिषदे – आपली पुराणे; आपली शास्त्रसंपदा (३० पुस्तके)
समुदायाने जोडले
बंद