वर्णन
'माणूस' साप्ताहिकात श्री. ग. माजगावकर यांच्याकडे संपादनाचे धडे घेतलेल्या मेधा राजहंस यांनी १९८७ मध्ये उन्मेष प्रकाशन सुरू केले. नवलेखक, नवे विषय आणि माहितीपर ललित गद्य यांना महत्त्व देत संस्थेने तेवीस साहित्य प्रकारांत सातशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. अंधश्रद्धा वाढवणारे किंवा सवंग साहित्य प्रकाशित न करणे हा संस्थेचा नियम आहे.
संस्थापक: मेधा राजहंस
स्थापना: 1987
शहर: पुणे (सिंहगड रोड)
उल्लेखनीय पुस्तके: 'नव उन्मेष' दिवाळी अंक
समुदायाने जोडले
बंद