उत्कर्ष प्रकाशन

शहर
पुणे (डेक्कन जिमखाना)
स्थापना वर्ष
1971
वर्णन

उत्कर्ष प्रकाशनाची सुरुवात १९७१ मध्ये सु. वा. जोशी यांनी व्यंकटेश माडगूळकरांच्या 'कोवळे दिवस' या पुस्तकाने केली. लक्ष्मी रस्त्यावरील फुटपाथवर जुनी पुस्तके विकण्यापासून सुरुवात करून त्यांनी उत्कर्ष बुक सर्व्हिस, उत्कर्ष ग्रंथालय आणि उत्कर्ष प्रकाशन उभे केले. शांता शेळके, गंगाधर गाडगीळ, भा. रा. भागवत, रा. चिं. ढेरे यांसारख्या लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली. डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे.

संस्थापक: सुधाकर वामन (सु. वा.) जोशी

स्थापना: १९७१

शहर: पुणे (डेक्कन जिमखाना)

उल्लेखनीय पुस्तके:

  • कोवळे दिवस – व्यंकटेश माडगूळकर (पहिले पुस्तक, १९७१)
  • घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती – डॉ. ह. वि. सरदेसाई
  • सनी डेज – सुनील गावसकर (मराठी)
  • खडक आणि पाणी – गंगाधर गाडगीळ

स्रोत

समुदायाने जोडले
बंद