मुखपृष्ठ
ऐक सखे

माझे शेल्फ

ऐक सखे

इंग्रजी शीर्षक
Aik Sakhe
सारांश

ऐक सखे… वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्टी सांगत जाणारे, ‘अरेबियन नाइट्स’सारखे त्याचे स्वरूप आहे. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्ाळ्याचे, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही असामान्य नाहीत. आवतीभोवती असणाऱ्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे. ऐक सखे पुस्तक म्हणजे दहा कथांचा संग्रह. प्रत्येक कथा मनाला भिडणारी, विचार करायला लावणारी. प्रत्येक कथेमध्ये वपुंनी दिलेली उदाहरणं आणि दाखले वाचकाला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. माणूस कुठेतरी त्या दाखल्यांची/उदाहरणांची तुलना स्वतः अनुभवलेल्या गोष्टींवर करतो. नक्की वाचावे असे पुस्तक. वपुंच्या लेखनिकाचं काम बघणाऱ्या सौ. अनघा पत्की ह्यांचं विशेष कौतुक आणि आभार. सौ. अनघा पत्की ह्या व्यावसायिक लेखनिक नसून रसिक होत्या म्हणूनच, ठाणे ते परळ - टाटा हॉस्पिटलपर्यँत प्रवास. तिथे कॅन्सरवर ट्रीटमेंट, तसेच रेडिएशन. परळ ते वांद्रा प्रवास मग अर्धा तास विश्रांती. आणि मग रात्री साडेआठपर्यंत लेखन. हे सगळं त्या करू शकल्यात. खूप छान पुस्तक.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
किंमत
140.00
समुदायाने जोडले
बंद