मुखपृष्ठ
अंगतपंगत

माझे शेल्फ

अंगतपंगत

इंग्रजी शीर्षक
Angat Pangat
सारांश

द.मा. मिरासदार यांची पुस्तकं म्हणजे आनंदठेवाच.अंगतपंगत हे त्यांनी लिहिलेल्या एका सदराचं पुस्तक आहे. भविष्याच्या नादापासून डॉक्टरांपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी खुशखुशीत भाष्य केलं आहे.विविध विषय हाताळत त्या संबंधीच्या आठवणी किंवा हलके फुलके किस्से विनोदी शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.समग्र लेखन विनोदी नाही.ज्या ठिकाणी भावनिक किंवा वैचारिक विचार मांडायचे आहेत त्यावर विनोद करणे शक्य नाही असे स्पष्ट दिसते. हे पुस्तक म्हणजे दैनंदिन जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी आपण शब्दांकित करू शकतो याचे रास्त उदाहरण आहे.कुठेही ताणून केलेला विनोद नाही किंवा दाबून आणलेल्या दर्दी भावना नाहीत.सरमिसळ करत वाचकांच्या समोर आणलेले हे विषय वाचताना असे वाटते की "अरेच्या! हा असा किस्सा तर आपण देखील अनुभवला आहे" म्हणजेच लेखकाचे लेखन हे वाचकाच्या मनाला सहज भिडणारे आहे. माणूस, देशभक्ती, देवपूजा, संपादक,स्मशानभूमीतल्या कहाण्या, शूटिंग, दैव, गाजलेली ग्रंथ, देशी हॉटेल्स, भुतंखेतं, देवपूजा,तालीम इ. असे एकूण ३४ विषय वेगवेगळ्या लेखांत दिसतात. १४४ पानांचा हा ललित लेखसंग्रह वाचताना आपण लेखकाचे भाष्य समोरासमोर ऐकतो असेच वाटते. विनोदी लेखक म्हणून मिरासदार नावाजले असले तरी गंभीर लेखन करताना देखील ते तितक्याच उच्च प्रतीची भावना देऊन वाचकास खिळवून ठेवतात यात त्यांचे यश आहे. काही प्रसंगामुळे लेखकाचा मनमिळावुपणा, हजरजबाबीपणा अन सामान्य माणूस म्हणून जगण्याचा बाणा सहजपणे जाणवतो.अतिशय चांगले वाचनीय पुस्तक...नवोदित लेखकांनी तर नक्कीच वाचावे असे!!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
152
भाषा
मराठी
किंमत
240.00
ISBN
9789386454928
समुदायाने जोडले
बंद