मुखपृष्ठ
अस्तित्व

माझे शेल्फ

अस्तित्व

इंग्रजी शीर्षक
Astitva
सारांश

काल सुधा मूर्ती यांची "अस्तित्व" ही कादंबरी वाचली. ही कादंबरी म्हणण्यापेक्षा घराघरातील व्यक्तींच्या स्वभावांचे, घराघरातील घडणाऱ्या घटनांचे वास्तववादी चित्रणच वाटते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे "गोष्टी माणसांच्या" हे पुस्तक वाचलं होतं, ते वाचूनच मानवीस्वभाव वैशिष्ट्य, किंवा नात्यांची हळुवार गुंफण वर्णन करणार त्यांचं हळवं, भावनिक मन दिसून येतं.. "अस्तित्व" मधील नायक मुकेश याच्या आयुष्यात अचानक आलेलं वादळ आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी यांच अतिशय सुंदर आणि भावोत्कट वर्णन सुधा मूर्ती यांनी केलं आहे. नाती मग ती रक्ताची असो किंवा मानलेली असो ती निस्वार्थपणे कशी निभवायची असतात याचा सुरेख वस्तुपाठ त्यांनी या कादंबरीत दाखवला आहे. आयुष्यात येणारी संकटे, येणारी वादळे किंवा वाईट दिवसांना कस खंबीरपणे तोंड द्यावं आणि यात आपलं अस्तित्व पण कस टिकवाव हे कादंबरी वाचताना लक्षात येतं. निस्वार्थपणा, त्याग, निर्मोही वृत्ती काय असते; नात्यांची गुंफण कशी असते, नात्यांमध्ये निर्माण झालेला तिढा कसा लीलया सोडवला पाहिजे हे सर्व ही कादंबरी वाचताना समजून येते. अतिशय उत्कंठावर्धक असणारी ही पहिली कादंबरी असेल जी मी वाचायला घेतल्यानंतर पूर्ण संपवूनच खाली ठेवली असेल, अगदी पाषाणहृदयी माणसाच्यापण डोळ्यात पाणी उभं करण्याचं सामर्थ्य या कादंबरीत दिसून येत.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
100
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788177667653
समुदायाने जोडले
बंद