मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आयुष्याचे धडे गिरवताना

इंग्रजी शीर्षक
Ayushyache Dhade Giravtana
सारांश

Infosys Foundation" च्या अध्यक्षपदी असलेल्या सुविख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका सुधा मूर्ती लिखित हे अप्रतिम पुस्तक.प्रस्तुत पुस्तकात त्यांना भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे ही कथरूपात त्यांनी सादर केली आहे.आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक म्हणजे सुधा मूर्तींना आयुष्य गिरवताना मिळालेले धडे आहेत.यातील सर्व घटना ह्या कुठल्याही प्रकारे साहित्यिक वजन प्राप्त होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चष्म्याशिवाय लिहलेल्या आहेत.स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी अनुभवलेली दृश्यच त्यांनी शब्द रुपात चितारली आहेत.ही शब्दचित्रे न्याहाळताना आपल्या मानसिक विश्वात विविध रंगांची उधळण सतत चालू असते.हे रंग असतात कारुण्याचे, दुःखाचे,अनुकंपेचे,कृतज्ञतेचे.... तसेच पुस्तक वाचताना शब्दसौन्दर्याच्या सरी बरसत नाहीत तरी पण आपलं मन विविध मानवी भावांनी चिंब होऊन जाते.कारण हा चिंब करणारा कुंभ हा लेखिकेच्या अनुभवाने,औदार्याने भरगच्च भरलेला आहे म्हणूनच. या पुस्तकात लेखकीने त्यांच्या आयुष्यातील २३ अनुभव सांगितले आहेत.ह्या अनुभवांतून आपण काय शिकलो व मनाच्या प्रतलावर कुठले तरंग निर्माण झाले याच वर्णन केलेलं आहे. यातील गुणसूत्रे या अनुभवात आपल्या उद्विग्न मनाने म्हणतात माणसाला त्याच्या गुणसूत्रांमधून त्याच्या पूर्वजांची अनुवंशिक दुखणी तेवढी मिळतात; पण प्रामाणिकपणा, सचोटी असे गुण अनुवंशिकतेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अजिबात जात नाहीत, हेच खरं. तर मदत मध्ये दुःखी अंतःकरणाने लिहतात जर एखाद्या व्यक्तीला योग्य वेळेस मदत मिळण्याचं खरं मोल कधी कळूच शकलं नाही, तर त्या मदतीचं ओझं आयुष्यभर त्याच्या मनावर राहतं. त्याचप्रमाणे दुःखी सुख यात मनाच्या ओलावा किती आवश्यक असतो हे सांगताना त्या म्हणतात`यश, पुरस्कार, पदव्या आणि पैसा यांपेक्षा उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणं, सहानुभूती, सहवेदना आणि मनःशांती या गोष्टी आयुष्यात कितीतरी जास्त महत्त्वाच्या आहेत.’ थोडक्यात काय तर लेखणीच्या आयुष्यातील काही पानचं या पुस्तकात एकत्रित केलेली आहेत. वाचायला हरकत नसावी.

रंगीबेरंगी प्रतिबिंब दिसू लागले...बाळाची जणू एक ऐवजी दहा मुखे असावीत असा संभ्रम निर्माण झाला ...नऊ प्रतिबिंबाच्या मध्यभागी त्याचा स्वतःचा मोहक असा चेहरा असावा असे भासत होते म्हणून त्या बाळाचे नाव दशानन ठेवण्यात आले 🌼🌼 #वैश्रवन हा पुलस्तीकडे ज्ञान घेऊन आल्यावर त्याच्या मुखावर तेज दिसायला लागले,हे पाहून दशाननाच्या मनात वादळ उठले, परंतू दशननाने पिता विश्रवा कडून ज्ञान संपादन केले होते,पण त्यावर त्याचे समाधान झाले नव्हते, दशाननाला दोन भाऊ कुंभकर्ण आणि बिभीषण आणि बहीण शूर्पणखा हे होते 🌹🌹 #विश्रवाणे लंका वैश्रवनाला दिली पण ती अन्याय समजून दशननाने ती परत घेतली,कारण त्याचे आजोबा सुमाली याने लंकेची निर्मिती केली होती,ती दशाननाने हस्तगत केली,ज्या नितिशून्य व्यवस्थेने हे वर्णभेद निर्माण केले त्या वर्णभेदा विरुद्ध मीही आता निव्वळ पाशवी बळाचाच वापर करेन, न्याय,नीती,धर्म केवळ शस्त्र बळानेच प्रस्थपित होणार असतील तर मीही पाशवी बळाचाच वापर करीन ,भ्रष्ट मापदंड प्रमाण मानणाऱ्या एकूण एकाला त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर द्यायला मी मागेपुढे पाहणार नाही ,त्यासाठीच मी कटिबद्ध आहे असा दशाननाचा निर्णय झाला ** #तो राजांचा पराभव करीत सुटला पराजित राजांना आपले दास्य स्वीकारायला लावण्यात त्याला धन्यता वाटू लागली,ऋषींच्या यज्ञात जाऊन तिथे विध्वंस करणे यात त्याला समाधान वाटायला लागले, त्यातच वनात असताना शूर्पणखाने रामाकडे लग्नाची मागणी केली, त्याला नकार मिळताच ती चिडली लक्ष्मणाने रागाने तिचे नाक,कान कापून पाठवले,त्याचा राग येऊन ती रावणाकडे गेली व रामाचा सूड म्हणून त्याने कपटाने सीताहरण केले...रामाने सुग्रीव,बिभीषण व इतर वानर यांच्या मदतीने लंकेवर हल्ला केला आणि पापी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली , तिने अग्निपरीक्षा दिली परंतु रामाचे मन शांत नव्हते...तेव्हा ते ऋषी वाशिष्ठकडे गेले व त्याचे कारण विचारले,ते म्हणाले "रामा तू म्हणालास त्याप्रमाणे तू केलेला रावनवध म्हणजे अधर्माशी, अनितीशी दिलेला लढा होता,लोक एव्हढेच समजतात की,आपली पत्नी परत मिळविण्यासाठी रामाने हजारो सैनिकांचे प्राण घेतले. परंतू हे पूर्ण सत्य नाही,याची तू लोकांना प्रचिती आणून दे,त्यासाठी तुला सीतेचा त्याग करावा लागेल, त्या प्रमाणे लक्ष्मण सीतेला वनात सोडून आला 💐💐 #पण लक्ष्मणाला तो आपला अपराध वाटला,आणि त्याने शरयू नदीत आपला देह अर्पण केला आणि त्यानंतर रामाने सुद्धा शरयू नदीत आपला देह अर्पण करून आपले अवतार कार्य संपविले.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
9788184984873
समुदायाने जोडले
बंद