मुखपृष्ठ
बकुळा

माझे शेल्फ

बकुळा

इंग्रजी शीर्षक
Bakula
सारांश

सुधा मूर्ती लिखित बकुळा ही कादंबरी वाचली. श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमावर आधारित अशी कादंबरी मी पहिल्यांदाच वाचत आहे .सामाजिक विषयावर अत्यंत संवेदनशील व परखडपणे आपल्या लेखणीतून विचार मांडणाऱ्या आदरणीय सुधा मूर्ती यांनी श्रीमती व श्रीकांत य दोन्ही पात्रावर लिहिलेली अशी ही कादंबरी एक वाचक म्हणून वाचतांना पुढे काय होणार ही उत्कंठा शेवटपर्यंत दाटून राहते. सामान्यतः शालेय जीवनातील प्रेम बकुळीच्या झाडाखाली व साक्षीने बहरणारी प्रेम हे सर्वसाधारणपणे आजवर आपण वाचत आलेल्या कथा किंवा सिनेमा प्रमाणे या जोडप्यांचे विवाह पर्यंत पोहोचते इथपर्यंत कॉमन आहे. पण खरी कथा विवाहानंतर सुरू होते. कारण या कथेत श्रीकांतच्या यशामागे सदैव श्रीमतीची त्याला मिळालेली साथ् तिने दिलेल्या त्याग व त्यांचे प्रेम बकुळीच्या साथीने बहरत त्यांचे महाविद्यालयीन जीवन पुढे सरकत जाते. पुढे विवाहानंतर पती तसेच पतीचे कुटुंब, सासर च्या व्यक्ती, पतीचे करिअर आणि पतीचा उत्कर्ष आणि प्रगती हेच सर्वस्वी मानून त्याचे यश त्याची भरभराटी त्याची कीर्ती हेच लक्ष ठेवत स्वतःच्या आशा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा स्वतःचे इतिहासावरील प्रेम, याला तिलांजली देत सर्वस्वी अर्पण करणाऱ्या श्रीमती ला तिच्या स्वः ची जाणीव होईल का ? बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिली येणारी श्रीमती, महाविद्यालयीन जीवनात इतिहासातील महान तज्ञ यांची आवडति विद्यार्थीनी इतकेच नव्हे तर प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ कोलिन्स यांची देखील ती आदर्श विद्यार्थीनी होती. तिला पीएचडीसाठी अमेरिकेत अमेरिकेत स्कॉलरशिप ची संधी मिळाली होती ती पुन्हा स्वीकारेल का ? जरी ही संधी पुन्हा मिळाली तरी एक पत्नी म्हणून श्रीमती ही आपला पती श्रीकांत चे वैभव, ऐश्वर्य सोडून इतिहासावर डॉक्टरेट साठी अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाईल का ? यावर श्रीकांत त्याची प्रतिक्रिया त्या दोघांमध्ये भावनिक संवाद एकदा वाचा. एका बैठकीतच वाचण्यासाठी ही कादंबरी आहे. जी वाचतांना कळत-नकळत आपण आजवर गाजवत आलेल्या पुरुषार्थ यावर स्वतः प्रश्नचिन्ह निर्माण करतो. इतकेच नाही तर खरेच आपण आपल्या जीवनातली श्रीमतीला तिने आजवर आपल्या उत्कर्षासाठी केलेला त्याग आपल्याला प्रत्येक क्षणाला बरोबरीने दिलेली साथ या सर्व विषयी आपल्या मनात नक्कीच भावना दाटून येतील.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
140
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788184980523
समुदायाने जोडले
बंद