बनगरवाडी
एक विशी-बाविशीतला मास्तर बनगरवाडीत येतो. पाहता-पाहता वाडीचा होऊन जातो. जीव लावणारा कारभारी, आगापिछा नसलेला आयबू, लोकांच्या शिवारातून चोर्या करून परत त्यांच्या मालकांना मी चोरी केली, असं जाऊन सांगणारा आनंदा, नांगराचं जू मानेवर घेऊन एका बैलाची कमतरता भरून काढणारी, नवरा अंजीच्या नादी लागलाय म्हटल्यावर वेगळी चूल थाटणारी शेकूची बायको इ. विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा माडगूळकरांच्या लेखणीतून चित्रदर्शित्वाने, रसरशीतपणे साकारतात. शाळेत तालीम बांधण्यासाठी एक झालेली वाडी, त्यादरम्यानचा संघर्ष आणि तालमीच्या उद्घाटनाला राजा आल्यानंतर गावात ओसंडून चाललेला उत्साह, वाडीतील दैनंदिन जीवन, सुगी, दुष्काळ, लोकरीती, समजुती, दैवतं इ.चं जिवंत चित्रण वाचकाला गुंतवून ठेवतं आणि मास्तराचं वाडी सोडून जाणंही मनाला कातर करतं. मास्तर आणि बनगरवाडीच्या भावविश्वाचं एकत्व अधोरेखित करणारी, मराठी साहित्यातील अक्षर-लेणं असलेली कादंबरी.
साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.मारुती चितम्पल्ली यांना अरण्यऋषी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांचा जन्म सोलापुरात 5 नोव्हेंबर 1932 साली झाला. वनाधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा केली. मारुती चितम्पल्ली यांनी वने, वन्यप्राणी जीवन आणि वन्यप्राणी व्यवस्थापन यासंदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन केले. वन्यप्राण्यांबाबत माहिती सांगणारी विपूल ग्रथसंपदा त्यांनी तयार केली. आज पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.