मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भंडारभोग

इंग्रजी शीर्षक
Bhandarbhog
सारांश

भारतीय समाज पूर्णतः जातीव्यवस्था आणि रूढी-परंपरांनी पोखरला गेलाय. हे फारच भयाण व अस्वस्थ करणारं आहे. या विदारक जातीव्यवस्थेचं चित्रण अनेक दिग्गजांनी केलंय, अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे पासून ते हल्ली अलिकडचं शरणकुमार लिंबाळे वगैरेपर्यंत या जातिव्यवस्थेची पाळंमुळं थोडीफार आता सैलही होताहेत. पण अजून बरच काही होणं आवश्यक आहे, अजूनहि बरेच आदिवासी समाज आहेत ज्यांना तर हेही माहित नाही कि ते स्वतंत्र्य आहेत, अजूनही त्यांची दैना संपलेली नाही. हे कमी कि काय म्हणून बऱ्याच घाणेरड्या रूढी - परंपरांनी वेढलंय, यात देव-देवस्की, पशु बळी, नर बळी, जोगते-जोगतिणी आणि बरंच काही ..... :(. या सगळ्यात भरडला जाणारा सर्वसामान्य माणूस, जो जातीव्यवस्थेचं खालचं टोक आहे. असो, यात जोगते-जोगतिणी हे बऱ्याच जातीतले असतात, तर हे जोगते-जोगतिणी होतात कसे? तर केसात केसांची जट सापडली तर ती देवीची, म्हणून तीला भंडारा लावून पुजलं जातं आणि तीला जोगतीण म्हणून सोडलं जातं आणि सांगितलं जातं कि रोज वडाचा-पिंपळाचा चीक केसाला लावून त्यावर भंडारा टाका. म्हणजे होत काय कि हि छोटी असणारी बट कालगणिक वाढत जाते. तर आजारी मुलांना / पुरुषांना बरं व्हावं म्हणून भंडारा लावून देवाला सोडलं जातं. एकदा यांना देवार्पित केलं कि पुन्हा आयुष्यभर त्यातून सुटका नाही, त्यातून मृत्यूच सोडवून नेतो. याना कोणी वाली नसतो, नुसती आयुष्यभर फरफट चालू असते. किमान जोगतीणीला कुणी तरी रखेल म्हणून ठेवतो, तिला हवं तेव्हा सोडून देतो. तीच्या पोटात गर्भ राहिला तर पाडून टाकतात वा नशिबानं जन्माला तर कुठेही तो मांसाचा जिवंत गोळा कुठंही उकिरड्यावर फेकला जातो त्यातून, तो वाचला-जगाला तर तो एखाद्या मेळ्यात चौंडकं वाजवत फिरतो, भिकारी होतो. जोगतीण मेल्यावर तीचा अंत्यविधी तरी गावकरी करतात. पण जोगत्याला तर मेल्यावर कुणी खांदा द्यायलाही तयार होत नाही कारण त्यांना अप्रतिष्ठेची भीती असते.लेखकानं या जीवनाची समस्या मोठ्या ताकदीनं या कादंबरीत मांडली आहे. जोगत्याच्या जीवनाबरोबरच चौंडक्या, मेळ्यातल्या जोगतिणी यांचं एक विश्वच या कादंबरीनं वाचकासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचकाला सुन्न करून सोडते, विचार करावयास लावते. हेच कादंबरीचं यश आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
230
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788177660630
समुदायाने जोडले
बंद