मुखपृष्ठ
भोकरवाडीच्या गोष्टी

माझे शेल्फ

भोकरवाडीच्या गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Bhokarvadichya Goshti
सारांश

विहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’सारखी ‘भोकरवाडी हाय’ कंपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी... गुप्त धनाच्या शोधात कुलंगडी शोधणारा नाना चेंगट... साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पैलवान... खव्याचा गोळा विकून आलेल्या पैशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणा-या बापूची झालेली त-हा... चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणा-या नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं... बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणा-या हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.... भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणा-या आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायलाच हव्यात!

मित्राची जामिनकी अंगावर येऊन प्रेसचा व्यवहार संकटाचा ठरला. गांधी हत्येनंतरच्या कोल्हापुरातल्या दंगलीत सायकलीचं दुकानही लुटलं गेलं. आशाची आई पन्हाळ्याची. तिचे वडील तलाठी. घरात आबादी. सोनं-नाणं भरपूर. सर्व्हिस मोटारीच्या धंद्यातल्या भागीदारीसाठी अम्माचे सगळे दागिने सादोबा मुलावरच्या चुलत भावाकडं दिले जातात आणि शिकारीच्या दौऱ्यावर आईच्या वडिलांचा हृदयविकारानं मृत्यू होतो. नातलग हुसकावून लावतात आणि पहिल्यांदाच ती घरकामासाठी म्हणून घराबाहेर पडते. पुढली तीस वर्षे वडलांच्या श्रीमंतीचा विषय निघाला की, ‘क्या जलाने की उनकी शिरमंती, बडेजावी? बडा घर, पैसा, दागिना हामना क्या मिला?’ अशी ती उपेक्षा करीत राहिली. नवऱ्यावरचा राग मुलीवर काढीत राहिली. आशाचे वडील भई मेहता कंपनीत नोकरीला लागले असले तरी पैसा पुरायचा नाही. भई कविमनाचे तर आई ‘की गे कुत्ते’ असं म्हणून बोलणारी, ‘आगे ए छिनाल इधर आ’ असा ओरडा तर दिवसातून हजारवेळा होई. कोणाकडून आणा घेतला म्हणून तापलेलं उलथनं तळहातावर चर्रकन ओढण्याचीही तिनं तमा बाळगली नव्हती. आठव्या वर्षीच सकाळी लवकर उठून असंख्य कामं मागं लागलेली. थोडा कंटाळा केला की, ‘क्या गे चिपलककी मूँ की’ अशी शेरेबाजी. कामानं थकायला व्हायचं. कधी ताप यायचा, गालगुंडही होत असे, पण आईनं हात लावून कधी विचारपूसही केली नाही. एकदा तर चुलीच्या कोपऱ्यातले जळणाचं लाकूड तिने दोनही पायांवर इतक्या जोरात मारलं की, ती कुत्र्यासारखी केकाटत घराबाहेर पळाली. कधी घरात मटणरस्सा असला तरी भईच्या ताटात मात्र डाळ-आमटीच. अचानक भई आजारी पडून मरण पावतात आणि त्याबाबत आशा म्हणते, ‘आईकडून होणारी उपेक्षा, छळ ते बघत, सोसत आले होते. ते मुकाट राहत. भर्इंनी प्रेम निर्माण केलं, तर आईनं निर्माण केली दहशत. भीती.’ पंधरा दिवसांनी आशा शाळेत निघाली तर आईनं दप्तर ओढलं आणि फेकून देताना ती म्हणाली, ‘चुल्हे में चाल तेरी साळा.’ भर्इंची इच्छा होती. आशानं बॅरिस्टर व्हावं, पण आता शज्ञळा सुटली, शाळेत निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचा चषक मिळाला तर आईने तो रस्त्यावर फेकून दिला. चेपलेला तो चषक नंतर पेटते कोळसे घालून धूप म्हणून वापरला. आईनं आशाचं लग्न लावून दिलं तो दिवस अमावस्येचा. लग्नानंतर नवऱ्याबरोबर ही सिनेमा पाहायला गेली तर आल्यावर नवऱ्यासकट तिची कबख्तीच निघाली. पाच बहिणींना स्वातंत्र्य होतं, नव्हतं फक्त आशालाच. कारण तिच्यादृष्टीनं आशा म्हणजे अपशकुनी. पहिले गरोदरपण, कावीळ, अशक्तपणा आणि दिवसभर कानांवर पडणारे ‘ए टांगे के टप के मूँह की’ असले शब्द. बाळंतपणात तर बघालाही कोणीच नाही आणि अशी चार बाळंतपणं. दवाखान्यात कोणी न्यायचं नाही वा बाळंतपणानंतर कोणी भेटायला गेलेलं आईलाही आवडायचं नाही. एकटीनं खुरडत खुरडत घरी यायचं, चारही बाळंतपणाच्या काळातल्या ज्या आपत्तीचं वर्णन आशा आपराद यांनी पुस्तकात केलं आहेत ते पुढं पुढं वाचवत नाही. कधी विजेचा शॉक बसतो. कधी नाहक चोरीचा आळ घेतला जाऊनही नवरा तिची चौकशीही करीत नाही. बहिणींच्या लग्नात भांडी घासायची पाळी आशावर आली. थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आशा ठरविते तेव्हा माने केलेला घरातला दंगा अभूतपूर्वच; पण सारा जाच आणि त्रास सोसून आशा शिक्षणाला उभी राहते हा तिच्या आयुष्यातला पहिला निर्धार असतो आणि हेच वेगळे वळण ठरते. या पुस्तकात हादरवून सोडणारे अनेक प्रसंग आहेत. करुणा वाटते तसे प्रेमाचे उमाळेही येतात. आत्मकथेत असंख्य व्यक्तिरेखा आहेत. त्या इतक्या ठसठशीत आहेत की, त्यांच्या वर्तनातूनही आशाचं व्यक्तिमत्व काही अंशी उलगडत जातं. यातली हिंदी भाषाही वेगळीच आहे. याआधी मराठी मुस्लिमांची आत्मकथनं मराठीत आली असली तरी हे आत्मकथन त्यातल्या अनुभवानं वेगळं ठरतं.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
140
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788184982299
समुदायाने जोडले
बंद