मुखपृष्ठ
भुताचा जन्म

माझे शेल्फ

भुताचा जन्म

इंग्रजी शीर्षक
Bhutacha Janma
सारांश

दिवसा ती काहीही करत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते.त्यांचे पाय उलटे असतात म्हणे" अशी भुतांच्या बाबतीत आपल्या मनाची समज आहे आणि नेमका त्याचा ठाव घेत द. मा.मिरासदार यांनी भुताचा जन्म हे पुस्तक लिहिलं आहे. विनोदी धाटणीतील मेहता प्रकाशनाचे े १२६ पानांचे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष ते प्रसंग अनुभवत आहोत असे वाटते. भुताचा जन्म हा कथासंग्रह आपल्याला गावात घडलेल्या काही घटनांची आठवण करून देतो.त्यांनी वापरलेली गावरान भाषा वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक कथेतून एक वेगळं व्यक्तिचित्रण अभ्यासायला मिळतं. संवादातून काढलेले विनोदी चिमटे एकटेपणातही खो- खो हसायला लावतात. गंमत म्हणजे आपण इतके हसतो की समोरची व्यक्ती आपल्याला नक्कीच विचारते की " इतकं हसण्यासारखे काय आहे?" आणि आपण पूर्ण कथा सांगत सुटतो. हा लेखकाच्या लेखनशैलीचा विजय आहे. गावातील चालीरीती, परंपरा, पोशाख आणि भाकडकथा यांचे संमिश्र स्वरूप म्हणजे भुताचा जन्म. नाव जरी असे असले तरी प्रत्यक्ष भुताची एकच कथा आहे आणि बाकीच्या कथा ह्या त्या कथेतील ठराविक पात्राच्या वागणुकीला भूत म्हणून नोंदवतात असे मला वाटते. भुताचा जन्म कसा झाला यावरचा शोध, भवानीचा पक्षकार मधील मेहनती वकील नाना, भीमु बुरुडचा कोंबड्या विकण्याचा पराक्रम, नदीकाठी बाईच्या प्रेतावर झालेला काथ्याकूट,मारुतीचा कंटाळा,तात्याने विंचवाच्या मदतीने शिकलेली पंचाक्षरी,मैनाबाई स्वयंपाकीणीला नवऱ्याने हाल करूनही गेलेले दिवस, बाबू न्हाव्याचे " जावू दे कोर्टात" सांगून पैसे कमावणे, सोळा आण्याचे वतनदार चतुर अण्णासाहेब, बंड्याच्या तपकिरीचा शाळेतला उपद्व्याप आणि महाद्याने तालुक्यावर पाठवलेला निरोप अशा अकरा कथांचा हा संग्रह वाचताना वाचकाला खिळवून ठेवतो. एका खेपेतच पूर्ण संग्रह वाचला जातो. प्रत्येक कथेत शेवटच्या परिच्छेदात धक्का तंत्र वापरले आहे.त्यामुळे एखादी कथा सोडली तर बाकी कथांचा शेवट पटकन लक्षात येत नाही. अंदाज लावला तरीही तसा शेवट होत नाही यात लेखकाचा वाचनाचा दांडगा अनुभव जाणवतो. संवादात वापरलेल्या गावाकडील भाषेमुळे कथा आपलीशी वाटते. दीर्घकाळ धाटणीतल्या लघुकथांचा बाज राखुनही विनोदाची फोडणी जबरदस्त आहे. विनोदी संस्कृतीची जपणूक करणारा हा कथासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही नक्कीच असायला हवा... कारण मिरासदारांनी विनोदाचे बाळकडू इतरांपेक्षा जरा जास्तच प्यायलेले वाटते!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
148
भाषा
मराठी
किंमत
70.00
ISBN
9788184984682
समुदायाने जोडले
बंद