मुखपृष्ठ
छावा

माझे शेल्फ

छावा

इंग्रजी शीर्षक
Chhava
सारांश

सह्याद्रीतून उगवलेल्या तेजवंत छत्रपती शिवाजी राजांच्या राजपुत्राची, रुद्ररुप धारण करून मोघलांच्या छातीवर रुद्रतांडव करणाऱ्या सिंहाची , स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी चाळीस दिवस मुघलांच्या छावणीत अमानुष अत्याचार सोसलेल्या धर्मवीर अशा स्वराज्याचे दुसरेछत्रपती क्षत्रियकुलावतंस सर्जा संभाजी राजे यांच्या जीवनाची गाथा सांगणारा अद्भुत अमरग्रंथ छावा.‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
1980
पृष्ठसंख्या
456
भाषा
मराठी
किंमत
400.00
ISBN
9788172431082
समुदायाने जोडले
बंद