मुखपृष्ठ
द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस

माझे शेल्फ

द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस

इंग्रजी शीर्षक
The Ministry Of Utmost Happiness
सारांश

गुंतागुंतीचा उत्कंठावर्धक भावनिक खेळ... ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ हे अरुंधती रॉय लिखित पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या कादंबरीचा साहित्य परीघ जागतिक पातळीवरदेखील विशाल आहे. आजतोवर या पुस्तकाचा ४९ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांची ही दुसरी कादंबरी. या कादंबरीचा आवाका मोठा आणि त्यातली पात्रही बरीच. मात्र कथानक प्रामुख्यानं घडतं ते दिल्ली आणि काश्मीरच्या अशांत भागात. अन्जुम या महिलेभोवती हे कथानक फिरतं. मुश्ताक अली, जैनव आणि एस तिलत्तमा आणि डॉ. आझाद भारतीय तसेच अन्य दोन व्यक्ती या कथानकातील महत्त्वाची पात्र आहेत. एक मोठा कालखंड तसेच सरकारी यंत्रणा, दहशतवाद आणि धर्मांधता तसेच गरीब माणसांचं जगणं अशा अनेक गोष्टी या कथानकात वाचकांच्या समोर येतात. विविध भावभावनांचं दर्शन यातून घडतं.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद