मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द पेलिकन ब्रीफ

इंग्रजी शीर्षक
The Pelican Brief
सारांश

वॉशिंग्टनमध्ये, एका अंधा-या पोर्नो चित्रपटगृहात एका प्रेक्षकाचा गळा घोटून रहस्यमय खून होतो.... सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश जगातून नाहीसे होतात.... आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेनं डार्बी शॉ या घटनांच्या खोलाशी जाऊन, गुन्ह्याची संभाव्य उकल आपल्या संशोधनपर निबंधात करते. डार्बी शॉच्या दृष्टीनं तो अंधारात मारलेला एक वकिली तीर होता... परंतु, वॉशिंग्टनच्या राज्यव्यवस्थेला त्यामुळे सुरुंग लागण्याचा धोका निर्माण होतो. अनपेक्षितपणे, डार्बी एका हत्येची साक्षीदार होते.... वास्ताविक, तिथे तिचा बळी जाणं अपेक्षित असतं.... व्हाईट हाऊसच्या अंतर्गत गोटातून ही बातमी दडपून टाकण्यासाठी होणा-या दबावाला न जुमानता डार्बीनं लिहिलेलं ब्रीफ कोणा कर्दनकाळांच्या हाती पडलं होतं? आपल्या असामान्य प्रतिभेचा वापर त्या दुर्दैवी कारस्थानासाठी कोणी केला? एका निर्भय पत्रकाराच्या मदतीने डार्बीने त्या भीषण रहस्याचा घेतलेला शोध— सत्य जगापुढं आणण्यासाठी केलेला जीवघेणा संघर्ष ! पुरावे नष्ट करणारी दुष्ट शक्ती आणि पुरावे गोळा करणारी सुष्ट शक्ती यांच्यातील घनघोर संग्राम... द पेलिकन ब्रीफ जॉन ग्रिशॅम यांच्या तर्कशुद्ध, कायदेशीर लेखणीतून उतरलेले एक अद्वितीय थरारनाट्य...

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
360
भाषा
मराठी
किंमत
280.00
ISBN
9788177663204
समुदायाने जोडले
बंद