मुखपृष्ठ
डायरी ऑफ अॅन फ्रँक

माझे शेल्फ

डायरी ऑफ अॅन फ्रँक

इंग्रजी शीर्षक
Diary Of Anne Frank
सारांश

डायरी ऑफ ॲन फ्रँक" ही साहित्य जगताला दिलेली अनमोल देणगी आहे.एक तेरा वर्षे वयाची मुलगी निरागसपणे तिच भावविश्व आपल्या समोर मांडते. दुसऱ्या महायुद्धात नाझी भस्मासुराचा उदय होऊन त्याने ज्यु लोकांवर अनन्वित अत्याचार केले. त्या छळापासुन वाचण्यासाी फ्रँक व व्हॅन डॅन कुटुंबिय तसेच डसेल् असे ८ जण एका गुप्तनिवासाचा आसरा घेतात. अॅन लिहिते १२ जुन १९४२ ते ४ ऑगष्ट १९४४ पर्यंत घाबरून, रेडिओ हे एकमेव साधन बाहेरच्या गोष्टी समजण्याच, एकाच घरात कोंडुन, डोक्यावर सतत पकडले जाण्याची टांगती तलवार आणि प्रचंड ताण कसे जगले असतील ते ८-१० दिवस नव्हे तर तब्बल २६ महिने. यात अॅन फ्रँक आपल्या आयुष्यातील प्रत्येक हळुवार घटना बिनदिक्कपणे मांडते. मग त्यात आईविषयी असलेला राग असो किंवा समंजस वडील आणि उमलत्या कोवळ्या वयात प्रेमाची आस, पीटरला घेतलेले पहिले चुंबन अन् त्याच्याशी एकत्र बसुन व्यतीत केलेले क्षण, भविष्याविषयी केलेला विचार. ह्यात अॅन ह्या काळात तिच्या जोडीच्या मुलींपेक्षा प्रगल्भ आणि प्रौढ होते. परिस्थिती माणसाला जबाबदार बनवते. अखेर काय होते अॅन तिचे कुटुंबिय अन् सोबतच्या माणसांच यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.........गेल्या ४० वर्षांत या पुस्तकाच्या लाखो प्रति खपल्या!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद