मुखपृष्ठ
डॉलर बहू

माझे शेल्फ

डॉलर बहू

इंग्रजी शीर्षक
Dollar Bahu
सारांश

सुधा मूर्ती यांची एकच एक ओळख नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या समाजकार्य करतात, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आवडीने वाचल्या जातात, आता तर त्या मालिकांमध्येही काम करू लागल्या आहेत! त्यांचं मूळ लेखन इंग्रजीत असलं तरी त्याच्या अनुवादित पुस्तकांनाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. अशाच त्यांच्या एका पुस्तकासंदर्भात... डॉलरची सुखांतिका… ‘डॉलर बहू’ ही सुधा मूर्ती यांची गाजलेली कादंबरी या कादंबरीवर आधारित सीरिअलही तयार झाल्याने हे कथानक घराघरात पोहोचलं. सुधा मूर्ती यांनी भारतातल्या आणि परदेशातल्याही भारतीयाचं जीवन जवळून पाहिल्याने डॉलर त्यांच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणतो, हे त्यांनी अनुभवलं. वेगवेगळ्या माणसांच्या आयुष्यावर हा डॉलर कसा परिणाम करून जातो, याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं. त्यापैकी काहीचं आयुष्य अतिशय आनंदमय झालं तर काहींना याचं डॉलरने असमाधानाच्या गर्तेत लोटलं. ‘डॉलर बहू’ चा नायक हा खऱ्या अर्थाने नायक नाही. तो नोकरीसाठी धारवाडसारख्या गावात येतो. घरमालकाच्या घरात असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. पण तिचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. अशातच त्याला हवी असलेली अमेरिकेतली नोकरी मिळते आणि कुटुंब, प्रेम, नाती सगळं सोडून तो अमेरिकेला जातो. त्याचं तिथे स्थिरस्थावर होणं म्हणजे ग्रीन कार्ड मिळेपर्यंत त्या मुलीचं लग्नही होतं. तेही त्याच्याच भावाबरोबर. डॉलरमुळे श्रीमंत झालेला नायकाला कायमचं दु:ख मिळतं. पण यात एका श्रीमंत मुलीचं स्थळ त्याच्यासाठी येतं आणि पैशाचा हव्यास वाढलेली आई त्या मोहाला बळी पडते. इथून नायकाऐवजी गरीब सुनेची कथा आपला ताबा घेते. मग लग्नानंतर दोन सुनांमध्ये होणारा भेदाभेद हा कादंबरीचा बिंदू बनतो. आई अमेरिकेला जाते आणि कथेचं सूत्र तिच्याकडे जातं. नायकाची आई अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांच्या अनेक कथा ऐकते आणि आपल्या वागण्यातला दोष तिला कळून चुकतो. केवळ डॉलरच्या येण्याने आपण डोळ्यावर कातडं ओढलं होतं याचं दु:ख तिला होतं. आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक घटना घडताना आपण पाहतो. पैशाने ज्यांची प्रतिष्ठा वाढली आहे अशांशी आपण नकळतपणे आपली तुलनाही करतो. ‘डॉलर बहू’ याच स्थितीचं प्रातिधिनिक चित्र आहे. अनेक अनुभवांच्या कथा एकाच अनुभवात गुंफल्या आहेत, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. खूप अलंकारिक भाषा न वापरल्याने कथानक प्रवाही होत जातं. त्यात लेखिका सुधा मूर्ती यांच्याबरोबर अनुवाद करणाऱ्या उमा कुलकणी यांचंही कौशल्य म्हणावं लागेल. सुधा मूर्ती यांच्या पुस्तकाने आधीच बरीच लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक सांगायला नकोच.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद