मुखपृष्ठ
गावाकडच्या गोष्टी

माझे शेल्फ

गावाकडच्या गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Gavakadchya Goshti
सारांश

गावाकडच्या गोष्टी" हा व्यंकटेश मांडगुळकर लिखित कथासंग्रह . खरतर कथा म्हटलं की काहीतरी काल्पनिक गोष्टी किंवा उथळ काहीतरी भाकड गोष्टी असाच काहीसा समज असतो . शीर्षकावरून या पुस्तकाच्या खोलीचा अंदाज कधीच लागणार नाही. एखाद्या अस्सल खवय्या लाजसं काहीतरी गावरान खाण्याची भूक असते ती काहीतरी चमचमीत खाण्याने पूर्ण होते तसच एखाद्या अस्सल वाचकाला जर काही अस्सल गावरान किंवा ग्रामीण वाचायची इच्छा असेल तर त्याची वाचनाची भूक हे पुस्तक नक्कीच शमवेल . असे हे पुस्तक आहे . पुस्तकातील काळ हा ६०/७० च्या दशकातील असावा , तेव्हाची खेड्यांतील परिस्थिती , तेव्हाची अंधश्रध्दा , चालीरीती, परंपरा , न्यायव्यवस्था , आर्थिक साधने , वेशभूषा , यांचे वर्णन लेखकांनी इतकं हुबेहूब आणि अस्सल गावरान भाषेत केलं आहे की पुस्तक संपेपर्यंत ते खाली ठेऊच शकत नाही इतकं गुंतवून ठेवत . प्रत्येक गोष्ट इतकी अप्रतिम आहे की जसं किनाऱ्यावरून सागराच्या खोलीचा अंदाज लावू शकत नाही तस गोष्टीच्या शीर्षकावरून या पुस्तकातील गोष्टीचा अंदाज लावू शकत . प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्याला त्याकाळात घेऊन जाते . इतकं सुंदर वर्णन आहे की वाचक त्या कथेत गुंतत जातो आणि प्रत्येक गोष्टीच्या शेवटी मनाला चटका लावणारा आणि विचार करायला लावणारा शेवट हे या पुस्तकाच वैशिष्ट्य आहे. १२२ पानी १६ कथांचा संग्रह असणारे हे छोटेखानी पुस्तक निव्वळ अप्रतिम असा वाचानानंद देते हे हमखास .

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद