मुखपृष्ठ
गोष्ट हातातली होती

माझे शेल्फ

गोष्ट हातातली होती

इंग्रजी शीर्षक
Goshta Hatatli Hoti
सारांश

वाचकहो नमस्कार, आज व. पू. काळे यांच्या गाजलेल्या लघुकथा संग्रहापैकी " गोष्ट हातातली होती" वाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. अगदी सहज आणि मोहून टाकणाऱ्या कथा एका अर्थाने वेगळ्या विश्वात घेऊन जातात. जवळपास ५० हून जास्त पुस्तकांचे लेखन केलेल्या व. पू. नी या लघुसंग्रहात सन्यासाचं बारसे, हायर लेवल, बॅग, अशी बायको असा बॉस, ओळख, ती आणि तिची सवत, हेवा, आणि स्पीडब्रेकर अश्या दर्जेदार कथा रेखाटल्या आहेत. संवाद, पात्र, सेन्स ऑफ हुमर, आणि हजरजबाबी पणा या संग्रहाचे विशेष आकर्षण. मायाबजार, घर हरवलेली माणसं, गुलमोहर, माणूस, महोत्सव, किंवा हुंकार अश्या कित्येक लघुकथासंग्रहांचे लेखन मराठी साहित्याच्या वाचकास नवी दिशा देण्यारे ठरताहेत. घराघरांत भिंती बोलू लागल्या की मानवी जीवनातल अव्यक्त ते व्यक्त होऊ लागतं..... माणसामाणसातील भिंती आपल्या पेक्षा पक्क्या बांधणीच्या... अहंकाराच्या विटांवर नम्रतेने प्लॅस्टर. आपल्याला अहंकार नाहीं ह्याचाच अहंकार... एकदा नजरेखालून घालण्यासारखा लघुकथासंग्रह.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
142
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद