मुखपृष्ठ
घर हरवलेली माणसं

माझे शेल्फ

घर हरवलेली माणसं

इंग्रजी शीर्षक
Ghar Haravleli Manasa
सारांश

घर हरवलेली माणसंहे वपूं चं सुंदर पुस्तक वाचून झालं. आपल्या अवताल-भवताल दिसणारे मानवी संसार,त्या संसारी स्त्री-पुरुषांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणारे किंवा ती शोधायला वाचकांना भाग पाडणारे लेखक म्हणजे वपू असं त्यांच्या या कथांमधून जानवतं.जगण्याला दु:खाचे तडे पडत असतांना सुध्दा जीवनातील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणारी माणसं या पुस्तकात आहेत. तशीचं जगणं हे फार बेछूट मानणारी अन् स्वतः च्या जगण्याचा मनमानी महोत्सव करतांनाचं इतरांच्या जगण्याला चरे पाडणारी माणसं पण यात आहेत. घराच्या कानाकोपऱ्यात आयुष्य असतं हे ज्याला कळतं ..तो घर शोधतो ,घर सावरतो ...तो इमारत नव्हे तर घर जपतो. अशा अनेक पात्रांची कथा नव्हे तर व्यथा म्हणजे हे पुस्तक.... ही सारी भली-बुरी पात्र किंवा माणसं जगण्यासाठी जिवंत घरं शोधतांना दिसतात, तर कधी काहीजन घराची विण उसवू नये याकरिता जीवाचं रान करतात. खरंतर आयुष्य म्हणजे दोन घडीचा डाव....हा डाव आनंदाने खेळायला घरपण असणारं घर हवं. हे सार्याना मिळतं असं नाही... पण प्रत्येक माणसाला ते शोधण्याचं बळ नियती देते. काहींचा शोध पूर्ण होतो ...काही वपूंच्या पुस्तकातली घर हरवलेली माणसं होतात. उमरभर जिंदा रहा मगर जिंदगी देखी नही हे असूर या कथेतील वाक्य ...जीवनाची शोकांतिका दर्शवितं. शेवटी काय तर घर हवं ...घराला घरपण देणारी माणसंही हवी...म्हणजे कुणाचं घरं कुणातून हरवणार नाही. येवढचं काय ते या पुस्तक वाचनातून पदरी पडलं.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
182
भाषा
मराठी
किंमत
140.00
समुदायाने जोडले
बंद