मुखपृष्ठ
घरजावई

माझे शेल्फ

घरजावई

इंग्रजी शीर्षक
Gharjawai
सारांश

खुसखुशीत विनोदाचा नजराणा : ‘घरजावई’… घरजावई ह्या आनंद यादवांच्या विनोदी कथा संग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. तसे पहायला गेले तर ‘जावई’ ही चीज हमखास रडकुंडीस आणणारी अशी आहे हे कोणीही मान्य करील परंतु यादवांचा ‘घरजावई’ वाचकांच्या डोळ्ातून पाणी आणवतो हे जरी खर असले, तरी ते हसत हसत आणले जाते. आणि एक सुखद सहवास त्यामुळे आपण् अनुभवतो. एकूण १४ कथा असलेला हा संग्रह वाचकांना हसवत हसवत मानवी मनाचे विविध पापुद्रे उलगडून दाखवतो. ‘घरजावई’ ह्या कथा संग्रहाच्याच शीर्षक कथेत, ‘‘इस्टन बारदाणा’’ सांभाळण्यासाठी एकुलत्या एका लेकीच लग्न करून घरजावई आणू पाहणारी विधवा म्हातारी पुढे लग्नानंतर जावई ‘‘घरजावई’’ म्हणून राहण्याची टाळाटाळ करतो हे लक्षात आल्यावर संतापते आणि त्या जावयाला धडा शिकविण्यासाठी ती गावच्या दादाच्या मदतीने लेकीला जावयाच्या घरून पळवून आणते आणि त्या दादाच्याच घरी ठेवते. यौवनाने फुलारलेली म्हातारीची लेक अलगद घरात आल्यावर तो दादा आल्या संधीचा फायदा घेणार नाही तर नवलच! आणि पुन्हा त्या दादाच्या तावडीतून लेकीला सोडविण्यासाठी म्हातारी गावात नुकत्याच बदलून आलेल्या फौजदाराची मदत घेते आणि फौजदार साहेबही आलेली गुलकंदी संधी साधून लेकीला घेऊन गावच सोडून जातात. येनकेन प्रकारे घरजावई आणण्याचा म्हातारीचा इरादा असफल होतो. म्हातारी हतबल होते आणि त्याचवेळी लेकीवर आणि इस्टेटीवरही सुरुवातीपासूनच मन जडावून बसलेला घरगडी तिच्या लेकी विषयीची संपूर्ण आशा मावळल्यावर म्हातारीलाच पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देतो आणि त्या घरात घरजावई म्हणून नाहीतर चक्क घरधनी म्हणून शिरण्याची केविलवाणी धडपड करतो तेव्हा त्याची चिवट आशा वाचकाला खुदकन हसू फोडते. ‘‘म्हातारी आणि कोंबडी’’ ह्या कथेत मानवी स्वभावाच्या स्वार्थीवृत्तीवर प्रकाश टाकला आहे तर ‘तिरकूट’’ ह्या कथेत नवरा उपवासादी अंधश्रद्धेवर मार्मिक हल्ला केला आहे. ‘‘बाईची नेमणूक’’ ह्या कथेत शाळेसाठी नेमणूक झालेल्या बाईभोवती लाळ घोटणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या चढाओढी खुसखुशीत शैलीत चित्रीत केल्या आहेत. ह्या कथेद्वारा ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या स्त्रियांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन कसा किळसवाणा असतो याची प्रचिती येते. ‘रांगडेवाडीचे गांजाध्यक्ष’’, ‘‘छंद असा करावा’’, ‘‘त्र्याहत्तर खोड्यांचा’’ ह्या मस्तपैकी हसवणाऱ्या कथा आहेत. ‘‘गायकवाडीची गाठ’’ ह्या कथेत तथाकथित ग्रामीण लेखकांची खिल्ली उडवली आहे. तर ‘‘मेंढरं’’ ह्या कथेद्वारा ग्रामीण भागांतील शैक्षणिक क्षेत्रातील अनास्था व गलथान कारभार लेखकाने नजरेस आणून दिला आहे. ‘‘धुळवड’’ व ‘‘महाराणी अविवाचे साम्राज्य’’ ह्या कथांना लेखकाने जरी विनोदाची डूब देण्याचा त्या कथाबीजांना मुळातच अंतर्मुख करणारा संदर्भ आहे. फावल्या वेळेला खुमासदार चव आणण्याचे सामर्थ्य आनंद यादवांच्या ‘‘घरजावई’’त नक्कीच आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद