मुखपृष्ठ

माझे शेल्फ

इल्लम

इंग्रजी शीर्षक
Illum
सारांश

संपतरावांच्या डोक्यात एक गोष्ट गच्च बसली. अगदी सिमेंट काँक्रिट! संपतराव रोज आपलंच डोकं खात बसला. पंधरा लाख देऊनही नाव होत नाही म्हणजे काय? काहीतरी इल्लम सापडलं पाहिजे... असं काय करावं? काय काढावं? काहीतरी चकित करणारं सापडलं पाहिजे... सगळ्या पेपरात बातमी आली पाहिजे. सगळ्यांच्या तोंडी आपलाच विषय निघाला पाहिजे. नावाचा डंका गाजला पाहिजे! नाव गाजत नाही, तर मग एवढा पैसा मिळवून तरी काय फायदा? एवढे नोकरचाकर, गडीमाणसं राबतात. एकाला दोन बंगले, गडगंज इस्टेट, सोन्याचांदीची भांडी, दागदागिने, काश्मिरी कार्पेटस् साऱ्या जगातून आणलेल्या शोभेच्या सुंदर सुंदर वस्तू... कोणत्या गोष्टीची ददात आहे? एवढं ऐश्वर्य पायाशी लोळण घेतंय, पण त्याचा उपयोग काय? नाव नाही... एका रात्रीत नाव व्हावं, पेपरात सगळीकडं छापून यावं, असं काहीतरी इल्लम काढलं पाहिजे. आणि एक दिवस संपतरावांनी इल्लम काढलं!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
98
भाषा
मराठी
किंमत
90.00
ISBN
9788177668520
समुदायाने जोडले
बंद