मुखपृष्ठ
जांभळाचे दिवस

माझे शेल्फ

जांभळाचे दिवस

इंग्रजी शीर्षक
Jambhalache Divas
सारांश

जेव्हा... मनाला भुरळ घालणारे ‘जांभळाचे दिवस’लवकर संपतात, टेकडीचा ‘उतार’ उतरायलाही वामनरावांना फार वेळ लागतो, पोस्टमनच्या ‘अनवाणी’ पायांना वहाणा मिळतात, मनात आणि घरात कोणालाही शिरकाव करू न देणाऱ्या ‘बाई’ बदलतात, मर्यादशील वंचा बाजारची वाट चालताना मन मोकळे करते, विस्मृतीत गेलेले प्रेम ‘सकाळची पाहुणी’ बनून अनंतरावांकडे येते, ओढग्रस्त परिस्थितीत मुलासाठी घेतलेली ‘सायकल’ हरवल्यानंतरही काळे मास्तर सुटकेचा नि:श्वास सोडतात, तेव्हा... काय घडते? या अनुभूतीचा अवीट बहर म्हणजेच ‘जांभळाचे दिवस.’जांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह वेगवेगळ्या ललित कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री रूपांना वाचकांच्या भेटीला आणतो. ग्रामीण आणि शहरी भागातील ही स्त्री रूपे वाचकांना नक्कीच भावतील.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
141
भाषा
मराठी
किंमत
50.00
समुदायाने जोडले
बंद