माझे शेल्फ
जॅक स्ट्रेट फ्रॉम द गट जॅक वेल्च
"
प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करताना जॅक वेल्च ने काया वाचा मने काम केले आणि एका पर्वतप्राय उद्योगाला महामेरूची व्याप्ती दिली. त्याचबरोबर सामूहिक नेतृत्व या संज्ञेला नवा अर्थ देण्याचे कामही केले.
जनरल इलेक्ट्रिक या जगविख्यात उद्योग समूहाचा कार्यकारी अधिकारी म्हणून २० वर्षाची कारकीर्द गाजवणारा जॅक वेल्च, त्याच्याच शब्दात आपल्याला या पुस्तकातून भेटतो. महाविद्यालयीन शिक्षणापासूनचा त्याचा या उद्योगसमूहाशी आलेला संबंध, त्याच्या निवृत्तीच्या क्षणीच संपला. त्यापूर्वीचे त्याचे बालपण व व्यावसायिक आयुष्यात त्याने येणार्या प्रत्येक संकटावर केलेली मात, घेतलेले धडाडीचे निर्णय, योग्य मनुष्यबळाची केलेली निवड, शंभर वर्षांहून जुन्या व्यवसायात आणलेल नवे - सिक्स सिग्मा, आधुनिकीकरण,
ई-व्यापार, ‘सुधारा-विका-विसर्जित करा’ उपक्रम याबाबतच्या सर्व कथा आपल्याला बरेच काही सांगतात. भारतात येऊन गेल्यावर, भारतीयांबाबत झालेले त्याचे मतही महत्त्वाचे आहे व ते आपल्याला त्याच्या व्यावसायिक व्यक्तिमत्त्वाचे रूप दाखविते.
‘‘निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू’’ हे समर्थ वचन त्यालाही योग्य प्रकारे लागू होते !
‘‘जॅक, अमेरिकेचे वैभव ... त्याच्या कार्यपद्धतीचे आपल्यापुढे ठाकलेले आव्हान.. अन् त्यामुळे आपणही सर्वोत्तम कंपनी बनवण्याचा प्रयत्न करतो.’’
डॉ. बर्नाडिन हेली,
अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी
अमेरिकन रेडक्रॉस
"