मुखपृष्ठ
काबुलीवाला आणि इतर कथा

माझे शेल्फ

काबुलीवाला आणि इतर कथा

इंग्रजी शीर्षक
Kabuliwala Ani Itar Katha
सारांश

पहिले नोबेल पुरस्कारविजेते रवींद्रनाथ् टागोर यांना कोण ओळखत नाही? ‘गीतांजली’ हा त्यांचा काव्यसंग्रह तर जगप्रसिद्ध आहे. त्यांचे आणखी मोठे योगदान म्हणजे भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकारही ते आहेत. अशा एकाहून एक सुंदर रचना करणारे टागोरही स्वत:ला कवीच म्हणवून घेतात. परंतु ते जरी स्वत:ला कवी म्हणवून घेत असले तरी ते स्वत: एक तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, संगीतकार, गीतकार, नाटककार, कादंबरीकार आणि कथाकारही होते. त्यांनी बंगालीतून अनेक उत्तम कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांमधून बंगाली समाजाचे दर्शन घडते. त्यांच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी माणूस असतो. तसेच त्यांच्या प्रत्येक कथेत निसर्गही डोकावतोच. त्यांची कथा म्हणजे एक कविताच आहे, असे वाटते. ‘काबुलीवाला आणि इतर कथा’ या त्यांच्या कथासंग्रहातील १५ कथा अशाच आहेत. त्यात त्यांनी समाजातील जातिभेद, ढोंगीपणा, भेदभाव, श्रद्धा-अंधश्रद्धा हे सर्व दाखवले आहे. त्या काळात बंगालमध्ये जमीनदारीचा समाजावर पगडा असल्याने जमीनदार व त्यांची रयत हे बऱ्याच कथांमधून डोकावते. काबूलहून, आपल्या गावापासून लांब कोलकत्त्यात व्यापारासाठी येणाऱ्या रहमतची कथा ‘काबुलीवाला’मध्ये आहे. तेथेच त्याला एक छोटी मुलगी मिनी भेटते. ती त्याला स्वत:च्या मुलीची आठवण करून देते. एक दिवस एका गुन्ह्याखाली काबुलीवाला यास अटक करण्यात येते. जेव्हा तो शिक्षा भोगून तुरुंगातून सुटतो तेव्हा मिनी लग्नाच्या वयाची झालेली असते. त्या वेळी त्याला आपल्या मुलीची आठवण येते. या कथेत मुलगी आणि पिता यांचे नाते लेखकाने दाखवले आहे. ‘बलाई’ या कथेत बलाई हा एक छोटा मुलगा म्हणजे मानवरूपातील निसर्गपुत्रच आहे. तो जेवढे निसर्गावर प्रेम करतो तेवढे कोणी करू शकते का? हाच प्रश्न पडतो. तो जेव्हा बोर्डिंगमध्ये जातो, तेव्हा त्यांनी लावलेल्या झाडातच त्यांची काकू त्याला पाहत असते. जेव्हा ते झाड त्याच्या काकाने तोडून टाकले तेव्हा त्याची काकू खरोखरच दु:खी झाली. या कथेत टागोरांचे निसर्गप्रेम दिसते. ‘बलाई’प्रमाणेच ‘सुटी’ या कथेतल्या केंद्रस्थानीही फटीक हा लहान मुलगाच आहे. रवींद्रनाथांच्या कथा शंभर वर्षांपूर्वीच्या जरी असल्या तरी त्या आजच्याच काळातल्या आहेत, असे वाटते. कारण अजूनही आपल्याकडे जातिभेद, दांभिकपणा आहे. त्यामुळेच त्या वाचताना कालबाह्य वाटत नाहीत. वाईटावर चांगुलपणाने मात केल्यास सर्वांचेच मंगल होते. हा सकारात्मक दृष्टिकोन मांडणारी कथा सौंदर्य व प्रसन्नता यांचा अनुभव देते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद