मुखपृष्ठ
कबंध

माझे शेल्फ

कबंध

इंग्रजी शीर्षक
Kabandh
सारांश

भेदक रहस्यांची गुंफण... मराठी सारस्वतात सर्व प्रांतात मुक्त विहार करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचा ‘कबंध’ हा गुढकथेचा संग्रह. ‘निजधाम’ व ‘खेकडा’ यापूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची गूढकथेची पुस्तकं तितकीच लोकप्रिय. मतकरी यांची नाटकं, कादंबरी, ललित लेखनाप्राणे गूढकथाही वाचकप्रिय आहेत. कबंध या पहिल्या कथेत त्याच पद्धतीची वातावरणनिर्मिती, मधुरा आणि रवी हे विवाहित नवदांपत्य मधुचंद्रासाठी लांबच्या बंगल्यात, निसर्गरम्य वातावरणात आलेले. पहिल्याच स्पर्शाच्या ओढीत स्वप्न रंगवणारे, पण रवीला एका स्त्रीचं शीर नसलेलं फक्त धड दिसतं. मुंडकं नसलेली ही स्त्री रवीची पहिली पत्नी. याचा पाठलाग कसा करते व शेवट काय होतो हे रत्नाकर मतकरी यांनी विलक्षण ताकदीनं गुंफलेलं. श्रीमंत कथेत अत्यंत गरिबीत जगणारा रमाकांत व त्याची पत्नी रजनी आहेत. रमाकांतला कामधंदा, नोकरी नाही. औषध न मिळाल्याने त्याच्या लहान मुलीचं निधन. रजनी हताश. त्यात रमाकांत अघोरी मार्गाला जातो, खूप श्रीमंत होण्यासाठी. मग तो श्रीमंत होतो का, त्याला काय अनुभव मिळतात हे थरारक चित्रण या कथेत आहे. दृष्टा अशीच वेगळ्या धाटणीची कथा. सर्वसाधारण बुद्धी नसलेला, पण असाधारण शक्ती लाभलेल्या पंडीतची कथा. म्हणूनच स्वत: आईचं मरण, वकील साने यांनी केलेला सुंदर पत्नीचा खून अशा गोष्टी त्याला आधीच दिसतात आणि या गोष्टीचा शेवटही धक्का देणारा आहे. लहानपणीच जन्म देऊन आई वारल्याने वडिलांचा रोष निर्माण झालेल्या विल्कूची ही कथा. वडील त्याला मुंबईला घेऊन जात नाहीत. तो आजीकडे शहाड या छोट्या गावी राहतो. त्याची खुनशी वृत्ती कशी उफाळते ती या कथेत परिणामकारक पद्धतीने लेखकाने चितारली आहे. प्रेम, माया न मिळाल्याने विल्कू कसा वागतो ते ‘लपाछपी’तून जाणवते. ‘म्हणजे कोण मागे आले’ या कथेत दोन डॉक्टर एकाच सुस्वरूप नर्सवर फिदा झाल्याची कहाणी. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढल्यानंतर डॉ. दिवेकर सुखी झाले का? त्यांना त्यांची प्रेयसी नीलिमा प्राप्त झाली का? हे वाचनीय आहे. ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ ही कथा अंधश्रद्धेवर आधारित आहे. बाबल्या रावळ दुकानदार. त्याची तरुण पत्नी गोकुळा. मूलबाळ नाही म्हणून ती देवदेवस्की किंवा करणी करते असा संशय. होळीला बाबल्या मोठा पेटारा अर्पण करतो. वाद्यं जोरात वाजवली जातात. होळीची बोंब सुरू. त्यात पेटारा टाकला जातो. पेटाऱ्यात काय आहे हे बाबल्याला माहीत. नंतर मात्र कोणीच बोलत नाही आणि गोकुळा गावकऱ्यांना दिसत नाही. ‘एक माणूस आणि एक पशू’ ही सूडकथा चमत्कारिक आहे. एका डॉक्टरने दुसऱ्याच्या सुस्वरूप पत्नीवर डोळा ठेवून त्या श्रीमंत माणसाचा पशू करणे, त्याला इंजेक्शने देणे अशी ही कथा.अखेरी तो पूर्ण पशू त्या डॉक्टरचाच जीव घेतो अशी कलाटणी. ‘असाही एक कलावंत’मध्ये एक बिलंदर आहे. त्याला कुणाचा तरी खून करण्याची खुमखुमी. रहस्यकथेचे बादशाह नानासाहेबांकडे तो येतो, त्यांचा सल्ला घेतो व कुणाचा खून करतो, त्यामुळे नानासाहेब वैतागतात अशी ही कथा. सर्वच कथा वाचनीय असून रहस्यमय गूढ निर्माण करणाऱ्या आहेत.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
156
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद