माझे शेल्फ

लीझ माइट्नर

इंग्रजी शीर्षक
Lise Mainter
सारांश

कुटुंबापासून दुरावलेली, ज्यू धर्म त्यागातूनही सदैव ज्यू ठरलेली, जर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिलेली एक ऑस्ट्रियन .... 'मला कायम निराश्रितासारखं वाटतं ' असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर.... आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरुषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुध्दा सहका-यांकडूनच हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तुत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, ती विसाव्या शतकातली थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाचं विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नरचं हे उत्कंठावर्धक चरित्र... वीणा गवाणकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल...

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
116
भाषा
मराठी
किंमत
100.00