माझे शेल्फ
लव्हाळी
१९३७ ते १९४२ पर्यंतच्या महाराष्ट्रीय जीवनाचे व त्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे झालेले परिणाम या गोष्टींचे दर्शन ’लव्हाळी ’ या कादंबरीतून घडते.... 'सर्वोत्तम' ही लव्हळीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा.... एका अर्थाने ’लव्हाळी’ चा तोच लेखक आहे.... तो आपले संसार-चित्र दहा वर्षांतील बदलांसह येथे चितारतो.... त्याच्या संसार-चित्राबरोबर शेंबेकरांच्या चाळीतील बदलते जीवनसुद्धा त्या अनुषंगाने घडत जाते.... शेंबेंकराच्या चाळीत जगणारे सर्व जीव हे जंतुंसारखे आहेत, इथून-तिथून त्यांच्या जगण्याला एक सीमित अर्थ आहे आणि जगाच्या पाठीवर मोठेमोठे बदल झाले तरी जीवनाशी चिवटपणे चिकटून राहणारी ही ’लव्हाळी’ मात्र तशीच राहते.... १९३७-४२ या कालखंडातील मुंबईतील चाळ संस्कॄतीतील जीवनाचे प्रत्ययकारी आणि सूक्ष्म दर्शन या कादंबरीतून श्री. ना. पेंडसे यांनी घडविले आहे.