माझे शेल्फ
मायाबाजार
मानवी मनाचे अंतरंग अत्यंत सहजपणे उलगडून श्रोत्यांशी संवाद साधत लेखन करणारे – श्री वसंत पुरुषोत्तम काळे यांनी मराठी वाचकांच्या मनात अढळस्थान प्राप्त केले आहे. मध्यमवर्गीय घरातील माणसे व त्यांच्या आजूबाजूचे जग यावर या संग्रहातील सर्व कथा आहेत. पण प्रत्ेक कथेतील विषय मानवी मनाचे विविध पैलू अत्यंत हळुवारपणे उलगडत जातो व वाचकांचे कथेतील पात्रांशी नाते तयार होते. माया बाजार या कथेत जुनी वस्तू देऊन त्याबद्दल नवीन वस्तू मिळण्याचे ठिकाण तेथून नवीन वस्तु घेऊन दोन दिवस नव्या वस्तूत रमतो. पण जुन्या वस्तूतील आठवणी मनात कुरतडत राहतात तर जुन्या बायकोच्या बदल्यात नवीन सुंदर बायको आणणारा महाभागही येथे दिसतो. याशिवाय या पुस्तकातील अधांतरी, मृदुंग, सरलाई, न उमटलेले छायाचित्र, दीडदमडीची माणसे, चोर व नालायक या सर्वच कथा अतिशय छान आहेत. प्रत्येक मराठी वाचकाने त्या वाचून त्याचा अनुभव घ्यायलाच हवा आहे. प्रत्येकाला आयुष्यात शिक्षक भेटतात. ते मुलांना वळण लावण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी व्रात्य मुलांना वळण लावण्यासाठी शिक्षा करतात. पण या कथेतील व्रात्य मुलगा शिक्षा भोगतो पण शिक्षकांवर आकस ठेवून, त्यामुळे पुढे आयुष्यात तो काही करू शकत नाही. मोठा झाल्यावर तो शिक्षकांना येऊन भेटतो. म्हणतो सर, मला तुम्ही नालायक म्हणत हिणवत राहिलात. आयुष्यात मी काही करू शकलो नाही. अशा विविध कथा मनाला चटका लावून जातात? हे महान लेखक आता आपल्यात नाहीत. पण त्यांनी केलेले लेखन. आपल्याला त्यांच्या उमद्या व्यक्तीमत्त्वाची साक्ष देते व त्यांचे लेखन परत परत वाचायला भाग पाडते. हे नक्की!